काही अश्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही
खरे तर सध्या या डिजिटल दुनियेमध्ये जगताना आपल्याला खूप साऱ्या गोष्टींची गरज लागते. तसेच आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा विविध माहितीची आवश्यकता असते. जी आपल्याला या तंत्रज्ञानाने तयार झालेल्या युगात मिळत असते. परंतु त्यावेळी आपल्या सुरक्षेचा विषय पुढे येतो. आणि काही गोष्टी माहित असणे हे पण तितकंच महत्त्वाचं असत. जेंव्हा आपण या गोष्टी समजून घेऊ तेंव्हा आपण या तंत्रज्ञानाने विकसित असलेल्या जगात सुरक्षित राहू. आणि त्या आपल्याला माहीत असायला पाहिजे कारण आपल्या आजूबाजूला रोज वेगवेगळ्या पद्धती मध्ये फसविण्याचे कृत्य चाललेले असते. ज्यामुळे आपल्याला त्रास सहन करावा लागतो तर या गोष्टी होऊ नयेत, म्हणून आपण पुढच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला पाहिजे.
Sync contact settings
मिञांनो ही जी काही सेटिंग आहे, ही खूप महत्त्वाची सेटिंग आहे. जी प्रत्येक मोबाईल मध्ये उपलब्ध असते जिचा उपयोग आपल्याला मोबाईल हरवला अथवा बंद पडला तर या सेटिंगचा उपयोग आपल्यासाठी महत्वाचा ठरतो. तर ही जी काही सेटिंग आहे तर यामुळे आपल्या मोबाईल मधील संपर्क माहिती ही आपल्या ईमेल वर प्रस्थापित करू शकतो. जेणेकरून मोबाईल हरवला अथवा बंद पडला, तर आपण या सेटिंगच्या सहाय्याने आपल्या मोबाईल मधील सर्व संपर्क माहिती ही पुन्हा प्राप्त करू शकतो यासाठी केवळ पुढील स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
१) आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये प्रवेश करा.
२) त्याठिकाणी असणाऱ्या सेटिंग या पर्यायावर टॅब करा.
३) पुढे एक्सप्लोर कॉन्टॅक्ट असा पर्याय दिसेल त्यावर टॅब करा.
४) आणि आपले सर्व काँटॅक्ट एस.वाय.एन.सी करा म्हणजेच ईमेल मध्ये सेव्ह करा.
Contact - settings - explore - sync email
Mobile SAR valu
मित्रांनो जस जसे वेगवेगळे स्मार्टफोन्स आपल्या हातात आले. तसतसे आपल्या मनातील उत्सुकता आणि त्याची मोहकता ही काय आपल्याला त्याच्यापासून सोडत नाही. परंतु हेच स्मार्टफोन आपल्या अती वापरामुळे आपल्या शरीरावर परिणाम करू शकतात. ज्यांचा आपल्या जीवनात खूप तोटा होऊ शकतो. तर ते कसे तर याच आपल्या सुंदर दिसणाऱ्या मोबाईल मधून रेडिएशन बाहेर पडत असतात. ज्या आपल्या मोबाईल मधील अँटेना मधून आपल्या भागात लावलेल्या नेटवर्क टॉवर ला जोडलेल्या असतात. यामुळे त्या रेडिएशन उत्सर्जित करत असतात.
आणि यामुळे आपल्या शरीराला हानी पोहोचवू शकतात. तर यासाठी काय करावे तर आपल्या मोबाईल डिव्हाईस मध्ये या गोष्टीस नियंत्रण म्हणून SAR valu specific absorption rate दिलेला असतो, म्हणजेच मोबाईल मधील शोषण दर दिलेला असतो. तर तो मोजून आपण आपला या रेडिएशन पासून बचाव करू शकतो. तो १.६ ग्रॅम च्या आसपास असायला हवा तर हा SAR valu कसा काढायचा? तर पुढील कोड आपल्या डायल की बोर्ड मध्ये प्रविष्ट करायचा आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी SAR valu पहायला मिळेल.
Chack code *#07#
Mobile limitations - 1.6
Head SAR limit - 791
तर हे आहेत सार मर्यादेचे काही महत्वाचे नियम यापेक्षा जास्त सार अस्विकृत असतात.
Chack mobile security
आपण आपल्या रोजच्या जीवनात वेगवेगळ्या वेबसाईट ला भेट देत असतो. आणि त्यामधून आपण माहिती घेतो. तसेच त्या वेबसाईट वर भेट देताना त्यामधील काही अश्या असमजनिय कृती आपल्याकडून होतात. जसे की आपण अनोळखी वेबसाईट ला भेट देतो तेंव्हा आपला डेटा चोरला जाण्याची शक्यता असते. तर त्यासाठी आपण कोणती काळजी घ्यायला हवी. आणि कोणत्या गोष्टीचा अवलंब करून आपल्याला समजू शकते? की आपण सुरक्षित आहोत की नाही? तर त्यासाठी पुढील गोष्टी करा
कोणत्याही अनोळखी वेबसाईट ला भेट देऊ नका. दिली तर काळजी पूर्वक माहिती घेऊन पुन्हा अँटी क्लीन करा.
आपला कोणताही पासवर्ड अथवा माहिती त्यामधे टाकू नका. तसेच आपली वैयक्तिक माहिती कोठेही प्रदान करू नका.
आपला मोबाईल सुरक्षित आहे की नाही हे तपासण्या साठी आपल्या मोबाईल मध्ये पुढील कोड टाकून पडताळणी करा.
Dialpad - enter Code - *#61# , *#21#
हा कोड वापरून मोबाईल सुरक्षेची तपासणी घ्या.
तर या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्याला माहीत असायला हव्यात.
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment