हॅलो फ्रेंड्स मी दररोज तंत्रज्ञानावर आधारित नवनवीन टिप्स घेऊन येत असतो. ज्या वापरून तुम्ही नक्कीच आनंद घेत असाल, तसेच त्या तुमच्यासाठी उपयुक्त सुद्धा ठरत असतील. तर अश्याच गोष्टी मी आज याठिकाणी सांगणार आहे, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त आणि महत्वाच्या तसेच तुमचं काम सोप्प करणाऱ्या ठरू शकतात. तर मग चला त्या जाणून घेऊ कोणत्या आहेत.
➪ आपल्या फाईल मॅनेजर मध्ये जा.
आपल्या फाईल मध्ये तो व्हिडिओ शोधा ज्याला MP3 मध्ये कन्व्हर्ट करायचे आहे.
➪ त्या व्हिडिओला rename या पर्यायाने एडिट करा केवळ
त्यामध्ये MP4 हा शेवटचा शब्द एडिट करा, MP3 अश्या स्वरूपात.
➪ आणि आपला व्हिडिओ MP3 मध्ये तयार करून मिळवा.
आपण आपल्या दैनंदिन जीवनात अनेक ठिकाणी फिरण्यासाठी जातो. तसेच त्याठिकाणी गेल्यावर आपण खूप सारे फोटो व्हिडिओ काढून घेतो. आणि घरी आल्यावर मोबाईल वर छानशी नोटिफिकेशन दिसते, जी सांगते तुम्हाला स्टोरेज फुल. आणि मग त्याठिकाणी आपल्याला मोबाईल हाताळायला समस्या निर्माण होतात. मोबाईल हँग होतो, स्लो चालतो. मग आपण काय करतो? आपला सगळा डेटा गुगल ड्राईव्ह वर पाठवतो, परंतु त्याठिकाणी पणं केवळ 15 जिबी स्टोरेज उपलब्ध असतो. तो भरला की तो सुधा फुल होतो. मग काय करायचं आपले फोटो व्हिडिओ कोठे सेव्ह करून ठेवायचे. तर त्यासाठी तुम्ही केवळ पुढच्या गोष्टी करत रहा.
➪ आपल्या मोबाईल मधील टेलिग्राम ओपन करा.
➪ त्यामध्ये एक ग्रुप तयार करा त्यामधे कुणालाही ॲड करू नका वाटले तर करू शकता ज्याला तुम्ही
शेअर करू शकत असाल.
➪ त्यानंतर तुम्ही तुमचे व्हिडिओ आणि फोटो त्या ग्रुप वर अपलोड करा. आणि सेव्ह करून ठेवा ते पणं कितीही मोफत आणि अमर्यादित.
मित्रानो कधी कधी काय होत, की आपल्याला आपला एखादा मित्र त्याच्या मोबाईल मधील फाईल मॅनेजरला अथवा गॅलरी ला असलेला पासवर्ड सांगत नाही. आणि मग आपल्याला निराश करून पासवर्ड न सांगता मोबाईल देतो. आणि कर काय करायचं ते अस बोलतो. तर मग यासाठी एक ट्रिक आज मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. की वापरून तुम्ही त्याचा पासवर्ड न घेता फाईल मध्ये प्रवेश करू शकता. त्यासाठी पुढे दिलेल्या पर्यायाचे अनुसरण करा.
➪ मोबाईल मधील गुगल क्रोम खोला.
➪ त्यानंतर file:///sdcard अस टाकून सर्च करायचं आहे.
➪ त्यानंतर तुम्हाला दिसेल की कोणकोणत्या फाईल आहेत त्याठिकाणी तसेच त्या तुम्ही ओपन करू शकता.
मित्रांनो तुम्हाला एखाद काम करून कंटाळा आला असेल. अथवा एखादी गोष्ट सतत करत राहिल्या मुळे कंटाळा येत असेल. तर ही गुगल ची ट्रिक तुमच्यासाठी आहे. तर याठिकाणी तुम्हाला क्रोम ब्राउझर उघडायचं आहे. त्यामधे तुम्हाला काही फ्री गेम्स दिल्या जातील. तर त्या तुम्ही खालील प्रमाणे उघडुन खेळू शकता.
➪ क्रोम ब्राउझर ओपन करा.
➪ त्यामध्ये google snack अस टाका, आणि सर्वात वरील लिंक वर क्लिक करा आणि गेम खेळा.
➪ Google poco man अस टाकून तुम्ही poco man ची गेम खेळू शकता.
मित्रांनो आपण जेंव्हा लांब जातो कुठे तरी फिरायला, आणि त्या ठिकाणाहून येण्यासाठी आपल्याला उशीर होतो. तेंव्हा आपल्या मोबाईल ची बॅटरी सुद्धा डाऊन होते. आणि त्यामुळे आपण मोबाईल मोबाईलची बॅटरी सेव्ह करण्यासाठी ब्राईटनेस कमी करतो, बॅटरी पॉवर मोड ऑन करतो. असे काही नुस्खे वापरतो तर त्यासोबत तुम्हाला पुढील गोष्ट करायची आहे. तर तुमच्यासाठी खास आजची ही ट्रिक आहे. जेंव्हा तुम्ही तुमच्या मोबाईल मधील बॅटरी वाचवण्याचा प्रयत्न करता. तेंव्हा केवळ तुमच्या मोबाईलचा फ्लाईट मोड चालू करा. आणि आपल्या मोबाईलला अजुन जास्त टाईम ॲक्सेस करा. नक्की करून पहा मोबाईल जास्त टाईम ॲक्सेस होईल.
तर मित्रांनो तुम्हाला या ट्रिक्स आणि टिप्स कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा. आणि अश्याच मजेशीर वेबसाईट टीप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment