Skip to main content

Information about computer course


खर तर आपण हे जाणतो की टेक्नॉलॉजी आणि त्याची मागणी किती वाढली आहे. अश्यात कॉम्पुटर बॅकग्राऊंड असलेल्या उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे बारावी पास झाल्यावर असे विद्यार्थी ज्यांना कमी कालावधीतच नोकरी सुरू करायची आहे. ते विद्यार्थी कॉम्पुटर एप्लिकेशन्स मध्ये आपल भविष्य बनवायला लागले आहेत.

 

 आणि अश्या विद्यार्थांसाठी एक खूप चांगला कोर्स आहे. डीम्प्लोमा इन कॉम्पुटर एप्लिकेशन्स म्हणजेच डी. सी. ए ज्या संधर्भात आपल्याला सुद्धा जाणून घ्यायला हवं. कारण तुम्हाला याबद्दल माहित व्हायला हवं, की हा कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे की नाही? त्यामुळे या टेक्निकल वेबमध्ये आपण हे जाणून घेण्यासाठी अजुन काही मिनिट याठिकाणी द्या. जेणेकरून ही माहिती समजेल. तर मग चला जाणून घेऊ.

 

डिप्लोमा इन एप्लिकेशन्स एक अल्प कालावधीत पूर्ण होणारा कोर्स आहे. या कोर्स मार्फत विद्यार्थांना कॉम्पुटर एप्लिकेशन्सची सखोल माहित मिळते. आणि यामध्ये विद्यार्थांना प्रॅक्टिकल आणि टेक्निकल अश्या दोन्ही स्तरावर माहिती मिळते. या कोर्स मध्ये अभ्यासले जाणारे विषय आहेत मायक्रोसॉफ्ट ऑफिस, ऑपरेटिंग सिस्टम डेटा मॅनेजमेंट, सी प्रोग्रामिंग आणि व्हिज्युअल बेसिक्स, फंडामेंटल इंटरनेट अँड कॉम्पुटर ऑर्गनायझेशन, मल्टिमीडिया अँड फोटोशॉप c ++ Java. 


या कोर्स बद्दल निकष सांगायचे झाले तर 10 + 2 class मधून पास करायला लागेल. आणि तुमचे साधारण 40% मार्क असायला हवेत, परंतु तुम्ही या कमीत कमी रेकॉर्डच्या अनुषंगाने अभ्यास करायला सुरुवात नका करू. उलट हे ध्यानात ठेवा की 10 + 2 तुमच्या भविष्यासाठी खूप महत्वाचे वर्ग असतात. त्यामुळे प्रयत्न तर अश्याच स्वरूपात करा की यामध्ये तुम्ही अव्वल आले पाहिजे. तुमची सर्व ऊर्जा यामध्ये कामाला लावा. तस या कोर्स बद्दल सांगायचं झाल तर या कोर्स मध्ये 10 + 2 बारावी वरच प्रवेश दिला जातो.

 

त्याचप्रमाणे यासाठी कोणतीच entrance exams नसते. अकॅडमी पार्श्वभूमी वरच तुम्हाला या कोर्स मध्ये प्रवेश दिला जातो. आत्ता जाणून घेऊ डिप्लोमा आणि कॉम्पुटर एप्लिकेशन्स कोर्स साठी प्रवेश घेण्याकरिता आपल्या भारतातील उत्कृष्ट कॉलेजची नावे, आणि त्यांची प्रवेश फी किती आहे? पंजाब युनि्हर्सिटीमध्ये या कोर्स ची फी 20,800 रुपये आहे, युनि्हर्सिटी ऑफ कलकत्ता यामध्ये 7810 आहे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याठिकाणी 5,850 रुपये आहे, जामियामिलियसलामिया युनिव्हर्सटी नवी दिल्लीमध्ये या कोर्सची फी 5,610, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास याठिकाणी या कोर्स ची फी 4,950 आहे, तर अलिगड मुस्लिम युनि्हर्सिटीमध्ये याची फी 1,900 आहे. याव्यतिरिक्त तुम्ही मुंबई मध्ये मुंबई युनि्हर्सिटी ऑफ मुंबई, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई, माधव युनि्हर्सिटी सिरोही, आणामलाई युनि्हर्सिटी चिदंबरम, आणि मद्रास ख्रिश्चन कॉलेज चेन्नई मधून सुद्धा हा कोर्स करू शकता. तुम्हाला वाटल तर तुमच्या मनाप्रमाणे या कोर्सला करू शकता. आणि जर तुम्हाला ऑनलाईन शिकायचे असेल तर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग, यु डमी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सोल्युशन यामधून तुम्ही या कोर्सला करू शकता. डिप्लोमा इन कंप्यूटर एप्लीकेशन पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मिळणारी नोकरी संदर्भात असणाऱ्या पोझिशन बाबत जाणून घेतले, तर कॉम्प्युटर ऑपरेटर वेब डिझायनर सॉफ्टवेअर डिझायनर सी प्लस प्लस डेव्हलपर आणि अकाउंटंट ची नोकरी मिळवू शकता.


कंप्यूटर ऑपरेटिंगच्या माध्यमातून तुम्ही दोन ते तीन लाख सॅलरी पॅकेज मिळवू शकता. वेब डिझायनरच्या पोझिशन वर तुम्ही चार ते पाच लाख सॅलरी घेऊ शकता. त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या पोझिशन वर तुम्ही तीन ते पाच लाख सॅलरी घेऊ शकता. सी प्लस प्लस डेव्हलपर होऊन तुम्ही ते पाच लाखांचा पॅकेज मिळू शकतात. या सर्व नोकऱ्यांच्या परिस्थितीला अनुसरून सिस्टीम टेस्टर, ग्राफिक डिझायनर, एप्लीकेशन सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर यासारखे पर्याय खुले असतात. परंतु तुम्ही जर तुमच्या सॅलरी पॅकेजला वाढवू इच्छित असाल तर, तुमच्या अनुभवाच्या सोबत तर हे नक्कीच वाढेल. तसं तर या ठिकाणी एक मुद्दा क्लिअर करणं खूप महत्त्वाच आहे. डी सी ए आणि ए डी सी ए मध्ये काय फरक असतो.


 तर लक्षात घ्या डी सी ए चा फुल फॉर्म तर तुम्हीच आणून आहात डिप्लोमा इन कम्प्युटर एप्लीकेशन आणि ए डी सी ए चा फुल फॉर्म होतो. ॲडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटर एप्लीकेशन या डीसी कोर्सची वैद्यता हे दहा ते बारा महिने असू शकते. तर ए डी सी ए ची वैद्यता ही बारा महिने असू शकते. डीसीएचा मेन ऑब्जेक्टिव्ह कम्प्युटर विद्यार्थ्याला कम्प्युटरच्या फंडामेंटल माहिती द्यावी लागते. आणि यासाठी इंटरनेट मायक्रोसॉफ्ट टूल सेटिंग सिस्टम सारखे टॉपिक अभ्यासावे लागतात. त्याच ठिकाणी ए डी सी ए हा एक उच्च पातळीवर असणारा कोर्स आहे. आणि याच्या नावातूनच समजतं की हा एक उच्च माध्यमावर असलेला कोर्स आहे. हा कोर्स कम्प्युटर एप्लीकेशन आणि त्याच्या वायटल एप्लीकेशनची सखोल माहिती आपल्याला देतो याच्या मुद्द्यांमध्ये टायपिंग पेज मेकर, मायक्रोसॉफ्ट ऑफिस टूल, टेली इ आर पी आणि डेटा मॅनेजमेंट इत्यादी समाविष्ट असतात. डीसीए पूर्ण केल्यानंतर आपल्याला मिळणारी सॅलरी डीसीए कोर्स पेक्षा जास्त असते. 

                                                                                            - Ramdas Joshi 

Comments