Skip to main content

Future-Progressing Business Based on Technology

 


भविष्याचा अंदाज घेणं आपल्याला अत्यंत मजेशीर वाटत, परंतु भविष्याचा अंदाज घेणं तितकं सोपे पण नाही. त्याचप्रमाणे आपण वर्तमान स्थितीला ध्यानात घेता, भविष्याबद्दल काही कल्पना या मनामध्ये तयार करतोच. आणि जेंव्हा समस्या भविष्य जडण घडणीच्या निगडित असतील, तर मग आपण विविध एक्स्पर्ट मार्गदर्शक यांच्या वेगवेगळ्या कल्पना आणि मते घेतो. कारण काही व्यक्ती या भविष्याला संस्कृतीच्या माध्यमातून बदलताना बघतात, तर काही आर्थिक दृष्ट्या बदलत्या भविष्याला बघतात. आणि सध्या तर आपण वर्तमान काळाचा विचार केला तर ऑटोमोबाईल ने मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. ऑनलाइन सोयी सुविधा मोठ्या प्रमाणात प्रगत होत आहेत, परंतु आत्ता प्रश्न येतो की स्मार्टफोन आणि इंटरनेट यांच्या वर्तमान काळाची भविष्य स्थिती काय असेल. आणि कोणते असे व्यवसाय असतील, की भविष्यामध्ये प्रगती करतील. अश्या परिस्थितीत जर तुम्ही पणं एखाद्या व्यवसायासंधर्भात जाणून घेऊ इच्छित असाल. जे भविष्यात मागणीच्या आधारावर प्रगती करू शकतात. तसेच वाढू शकतात. तर आजचा हा टेक्निकल वेबचा लेख खास तुमच्यासाठी आहे.
                         
कारण यामधे मी तुम्हाला अशा काही सहा व्यवसायासंधर्भात सांगणार आहे. जे वेगाने भविष्यात प्रगती करू शकतात. तर मग चला जाणून घेऊ भविष्यात कोणते व्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रगतीपथावर असू शकतात.


मोठ्या सामग्रीच्या या सुरवातीच्या काळामध्ये डेटा क्रंचींग याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते. सध्या प्रत्येक मोठमोठ्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर नवी माहिती संकलित करत आहेत. कारण आपले ग्राहक आणि स्पर्धात्मक दृष्टीने जास्त माहिती होऊ शकेल या उद्देशाने डेटा क्रंचिंग करत आहेत. डेटा क्रंचिग त्या आवश्यकता पूर्ण करू शकते. या व्यवसायाचे आव्हान हे आहे की केवळ नंबरला क्रंच करणे नाही, तर त्यांना अतिशय उपयुक्त बनवणे हेही तितके महत्वाचे आहे. डेटा क्रांचिग हा माहिती विज्ञानाचा एक असा भाग आहे. जो डेटा आणि माहितीच्या एका मोठ्या रकमेचा ऑटोमॅटिक प्रक्रियेला शक्य बनवतो. डेटा क्रांचिंग मध्ये डेटा प्रोसेस सोर्टेड आणि स्ट्रक्चर केलेले असतात. ज्यावर अल्गोरिदम आणि प्रोग्राम सिकवेंस रन केले जातात. मार्केटिंग आणि मार्केट रिसर्च यांसारख्या प्रगती क्षेत्रांमध्ये डेटाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ज्यावरून या शक्यता तयार होतात की भविष्यामध्ये डेटा क्रांचींग हा व्यवसाय जोमाने प्रगती करेल.


या संधर्भात तुम्हाला अंदाज आलाच असेल, तसेच याबद्दल आपण खूप काही जाणतो, आणि अजूनही खूप जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे भविष्यासाठी एक प्रगती करणारा व्यवसाय asteroid mining व्यवसाय सुद्धा असू शकतो. आज आपण पृथ्वीच्या संसाधनांचा उपयोग करत आहोत, परंतु आपल्याला हे समजले की स्पेस मध्ये असणारे सारे संसाधन कधीच न संपणारे आहेत. तर स्पेस मध्ये या संसाधनांना सापडणे, आणि त्यांना पृथ्वीवर आणण्याचं काम सुद्धा वेगाने होऊ शकत. आणि अश्या परिस्थितीत Asteroid mining हा व्यवसाय वाढण्याची शक्यता दर्शवतो, आणि प्रगती सुद्धा करू शकतो. अस्टरोईड मध्ये फॉस्फरस, झिंक, सिल्व्हर, गोल्ड, टिन, लेड आणि सल्फर सारखे असे काही घटक सापडतात. की जे आपल्याला उपयुक्त ठरतात. भले तुम्हाला हे थोड विचित्र वाटत असेल, परंतु आपण वर्तमान काळात राहून भविष्याचां अंदाज बांधत आहोत. आणि यामधे आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणत स्कोप असेल.


रोबोटिक्स मध्ये मल्टिपल scientific आणि इंजिनियरिंग डिसिप्लेन समाविष्ट असतात. रोबोटिक्स मॅकॅनिक वर्तमान काळात अस्तित्वात तर असतो. म्हणजेच आज सुद्धा आपण रोबोट बघतो जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने काम करताना दिसतात, परंतु यांची संख्या आणि यांची गरज प्रत्येक क्षेत्रात अनुभवली जाते. आणि यामुळे याचा उपयोग पुढे मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. सार्वजनिक वापरासाठी आणि वैयक्तिक वापरासाठी याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यामुळे या सर्व दृष्टिकोनातून या व्यवसायाला महत्व प्राप्त होऊ शकते.

 

नॅनो सॅटलाइट याचा व्यवसाय हा भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती करू शकतो. नॅनो सॅटलाइट ही अशी सॅटलाइट आहे की जिचा आकार आपण घेतलेल्या शूज बॉक्स एव्हढा असतो. परंतु हे उपग्रह इतके छोटे असून ही एका पारंपरिक उपग्रहा सारखेच काम करतात. नॅनो सॅटलाइट कम्युनिकेशन रिमोट सेंसिंग वैज्ञानिक रिसर्च high resolution stil imagery शीप ट्रॅकिंग सारखे कार्ये पूर्ण करण्यात उपयोगी ठरतात. यांसारख्या उपग्रहाची किंमत ही कमी असते. अश्यात ज्या लहान कंपन्या आहेत त्यांना सुद्धा हे उपग्रह बनवणे शक्य होईल. म्हणून नॅनो सॅटलाइट व्यवसायासाठी भविष्यातील आवश्यकता खूप चांगली आहे.


स्मार्टफोन आणि टॅबलेट मधून वेब सर्च करणाऱ्या लोकांचे नंबर इतके वाढले आहेत, की आत्ता कंपन्या याचा फायदा घेण्यासाठी मोबाईल मार्केटिंग सुरू करत आहेत. ज्याचा भविष्यात मोठा स्कोप दिसून येतो. याच्या मार्फत या कंपन्या त्या लोकांना टार्गेट करू इच्छितात. जे मोबाईल डिव्हाईसेसचा वापर करतात. मोबाईल मार्केटिंग मधे सल्लागारांची संख्या सुद्धा वाढवली गेली आहे. जे पुढे जाऊन जोमाने वाढणारी आहेत. कारण सध्या मोबाईल डिव्हाईसचां वापर एका लांब क्षणापर्यंत चालणार आहे.

स्मार्टफोनच्या या युगात आपली महत्वाची माहिती लिक होण्याचा खतरा मोठ्या प्रमाणात असतो. अश्या मध्ये डेटा प्रोटेक्शनची खूप गरज असते. कारण आज क्रेडिट कार्ड नंबर पासून ते वैयक्तीक फोटोपर्यंत सर्व काही लीक होत. अश्यामध्ये व्यवसायांना संरक्षण देण्याची गरज निर्माण होते. तसेच प्रत्येकाला वैयक्तिक पातळीवर काळजीपूर्वक सावधान राहणे कम्पल्सरी होऊन गेलं आहे. अश्यात डेटा प्रोटेक्शन आणि आणि रेपुटेशन मॅनेजमेंटला प्रायवन्सी प्रोटेक्शन फर्म विकसित होत आहे. ज्यांच भविष्य उजळ होताना दिसेल. 

 तर हे होते काही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रगती करू शकणारे व्यवसाय, ज्याचा एक भविष्याच्या आधारावर आपण आढावा घेतला. तर हे तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कळवा. 

 अश्याच वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर आधारीत टिप्स आणि ट्रिक्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
                                                                                                                         - Ramdas joshi 

Comments