Skip to main content

If you want to learn English then read this and learn



इंग्लिश शिकायची आहे का तर मग हे करा

आपला देश हा विविधतेने नटलेला आहे. ज्यामध्ये अनेक संस्कृती परंपरा तसेच विविध बोलीभाषा बोलल्या जातात. ज्या आपल्याला त्या प्रदेशात गेल्यावर अनुभवायला भेटतात. महाराष्ट्रात आले की मराठी भाषा, बिहार मध्ये गेल्यावर हिंदी तसेच अमेरिकेमध्ये गेल्यावर इंग्लिश, जर्मनी मध्ये गेल्यावर जर्मन. अश्या विविध प्रदेशामध्ये गेल्यावर या भाषांमधील होणारा बदल हा आपल्याला पाहायला मिळतो. खर तर भाषा हे एक दैनंदिन जीवनातील संवाद साधण्याचा प्रमुख घटक आहे. ज्याद्वारे आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो. आपल सुख-दुःख शेअर करत असतो. तसेच आत्ता प्रत्येक ठिकाणी आपल्याला इंग्लिश या भाषेवर प्रभुत्व मिळवणारी लोक जास्त प्रमाणात भेटत आहेत. जे विविध नोकरीसाठी, जी एखाद्या विशिष्ट भाषेवर अवलंबित आहे अश्या भाषा मानव शिकत आहे.  
                      तसेच इंग्लिश ही भाषा बहुदा प्रत्येक व्यक्ती शिकण्यास आतुर आहे, जेणेकरून ज्यांना भाषा येते त्यांच्यापुढे आपला स्वाभिमान कमी पडायला नको. तर या भाषा आपल्याला शिकायला अवघड का वाटतात? मित्रानो भाषा ही अवघड नसते, परंतु ती भाषा मला येऊ शकत नाही, अथवा मी शिकू शकत नाही ही संकल्पना अवघड असते. आपण जेंव्हा लहान होतो तेंव्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीचं ज्ञान अवगत नव्हत. परंतु ते ज्ञान आपल्याला कुठून मिळाल? तर ते ज्ञान आई - वडिलांकडून तसेच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सोसायटी मधून. जे लहानपण असमज होत ते एका उत्कृष्ट ज्ञानामध्ये परावर्तित होऊ शकते. तर मग आपण का करू शकत नाही. आपण एखादी गोष्टी करायला जातो तेंव्हा त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात नकारात्मक भावना जागृत होते. आणि नकारात्मक विचारांनी वेढलेल्या गोष्ट आपल्यासाठी अवघड ठरतात. त्यामुळे कोणत्याही नकारात्मक विचारांना आपल्या मनात आणण्याआधी त्यांची शहानिशा आपल्या प्रयत्नातून केली तर, कदाचित आपण सफल होऊन एक आत्मविश्वास मनात जागवू शकतो. तर कोणत्याही भाषेला अथवा एखाद्या गोष्टीचं कौशल्य शिकायचं असेल, तर मुळापासून सुरुवात करा नक्की आपल्याला धेय्य मिळू शकेल.
                    
 तसेच आज मी आपल्याला इंग्लिश शिकण्यासाठी एक वेबसाईट घेऊन आलो आहे. ज्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आपली इंग्लिश भाषा अवगत करू शकता तसेच प्रभुत्व मिळवू शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला या वेबसाईट मध्ये अनेक देशांच्या भाषा या शिकता येणार आहेत. ज्या तुम्हाला अत्यंत मजेशीर वाटतील, तसेच आपण लवकरात लवकर इंग्लिश शिकू शकता. आणि सध्या तर प्रत्येक ठिकाणी इंग्लिश ही येणे गरजेचे आहे. नोकरीसाठी, मार्गदर्शक म्हणून आपल्याला इंग्लिशचा उपयोग होताना दिसतो आणि त्याच्यात आर्थिक गरज ही  समाधानकारकतेने पूर्ण होते. त्यासाठी काही प्रयत्न आणि सातत्य यांचे मिश्रण करून त्याची योग्य रीतीने दररोज नियमितता बाळगली. तर एकदिवस तुम्ही नक्की इंग्लिश शिकू शकाल. केवळ इच्छाशक्ती आणि त्या गोष्टीबद्दल आपल्या मनात शिकण्याची तळमळ जागृत केली, तर ती भाषा नक्की एकदिवस आत्मसात कराल. तर मग चला उशीर न करता आपण आपल्या इंग्लिश भाषा शिकण्यावर लक्ष केंद्रित करू, त्यासाठी पुढील गोष्टी करा.

खालील पर्यायांचे अनुसरण करा. 

1) खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

2) पुढे तुम्हाला जी भाषा शिकायची आहे ती भाषा निवडा आणि सुरुवात करा शिकण्यास. 


तत्पूर्वी अश्याच मजेशीर, महत्वाच्या वेबसाईट आणि माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 

Comments