Skip to main content

Computer skills learn and get knowledge

 



                     कोणीतरी ठीक म्हटलं आहे, की वेळेसोबत ताल धरून चालायला हवं, अथवा गरजेचं आहे. म्हणजेच वेळेच्या हिशोबाने आपल्याला बदलायला हवं. आणि आपण अस नाही केलं तर टाईम पुढे निघून जाईल. आणि आपण मागे राहू, परंतु टेक्निकल वेब म्हणजेच आमच्या वेबसाईट मध्ये तुम्ही जोडून असाल तर तुम्ही पुढे जाण्याची शक्यता ही नक्की आहे. 

                             हॅलो फ्रेंड तुमचं सर्वांचं स्वागत आहे या टेक्निकल वेबमध्ये. तर गोष्ट अशी आहे की आजच्या काळामध्ये सगळ काही डिजिटल झालेलं. आहे आणि अश्यात विद्यार्थ्यांची रुची ही कॉम्पुटर टेक्नॉलॉजी यामधे जास्त दिसत आहे. प्रत्येकजण कॉम्पुटर शिकू इच्छितात. कॉम्पुटर विषयामध्ये अभ्यास करून आपल भविष्य बनवू इच्छितात. काही लोक कॉम्पुटर मध्ये हॅकर बनू इच्छितात. तर काही कॉम्पुटर एक्स्पर्ट बनू इच्छितात, परंतु तुम्हाला माहीत आहे का कॉम्पुटर एक्स्पर्ट बनण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल. आणि कश्याप्रकारे तुम्ही कॉम्पुटर मध्ये चांगल्या रीतीने शिकू शकता. तर आजच्या या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कॉम्पुटर एक्स्पर्ट कस बनायचं, तर कॉम्पुटरची सगळी माहिती कशी घेऊ शकता, तसेच त्यामध्ये हुशार कसे होऊ शकता. तर चला जाणून घेऊ. कॉम्पुटर एक्स्पर्ट बनणे, अथवा यामध्ये हुशार होणे हे काही एका दिवसाचं काम नाही. कॉम्पुटर मध्ये हुशार होण्यासाठी तुम्हाला खूप सारे महिने नाहीतर काही वर्ष लागू शकतात. आणि हे सर्व याच्यावर निर्भर आहे की तुम्हाला कॉम्पुटर क्षेत्रामध्ये किती रुची आहे. आणि रोज तुम्ही कॉम्पुटर शिकण्यासाठी किती टाईम देऊ शकता? आणि अश्यात खूप अशी लोक आहेत, जी कॉम्पुटरची डिग्री पूर्ण नाही केली, तरी कॉम्पुटर मध्ये हुशार होतात. तुम्ही पणं विचार करत असाल, की कश्याप्रकारे कॉम्पुटर एक्स्पर्ट होऊ शकतो. यासाठी कोणत्या प्रकारचा अभ्यास करायला हवा दहावी नंतर अथवा बारावी नंतर तर मग हे जाणून घेऊ.

जर आपण शाळेतील विद्यार्थी आहात. आणि तुम्ही पुढे जाऊन कॉम्पुटर मास्टर बनू इच्छित आहात, परंतु जर तुम्हाला कॉम्पुटर बद्दल काही येत नसेल, तर सर्वात प्रथम आपल्याला कॉम्पुटर बद्दल प्रमुख माहिती जाणून घेणं अत्यावश्यक आहे. जस की कॉम्पुटर काय आहे? कसा चालू होतो? कॉम्पुटर मध्ये रॅम काय असतो? हार्ड डिस्क काय असतो. कश्या पद्धतीने कॉम्पुटर मध्ये पासवर्ड टाकले जातात. तर सुरुवातीला आपण कॉम्पुटर अथवा लॅपटॉप चालवायला शिकायचं. यासाठी तुम्ही एखाद्या कॉम्पुटर संस्थेमध्ये जाऊन शिकू शकता. अथवा कॉम्पुटर घेऊन इंटरनेट वर सुद्धा शिकू शकता. तर कॉम्पुटर चालवायला शिकून घ्या त्यानंतर पॉवर, पॉइंट, एक्सेल, वर्ड, पेंट हे सर्व शिका. 
                          
आणि कॉम्पुटरच्या हार्डवेअर पार्ट संधर्भात माहिती सुद्धा घ्या त्याचप्रमाणे सर्वप्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टीम ला चालवायला शिका. एका कॉम्पुटर एक्स्पर्टला एकच ऑपरेटिंग सिस्टम चालवता येत नाही अस नाही, तर त्याला यासारखे विविध ऑपरेटिंग सिस्टम चालवता येतात. आणि त्याला अश्या गोष्टीची भरपूर माहिती असते. जसे की विंडो ऑपरेटिंग सिस्टम, मॅक ओएस, काली लिनक्स तर या सगळ्या ऑपरेटिंग सिस्टम बद्दल आपल्याला माहीत असायला हवं. त्याचप्रमाणे याला चालवता ही यायला हवं तरच तुम्ही या सर्व ऑपरेटिंग सिस्टमला आपल्या कॉम्पुटर मध्ये स्थापित करून या सर्व ओएसची माहिती घेऊ शकता. कारण जर तुमच्या कॉम्पुटर मध्ये कोणताही प्रॉब्लेम असेल. तर तो तुम्ही ठीक करू शकता. तसेच पुढचा मुद्दा आहे कॉम्पुटर प्रॉब्लेमला ठीक करायचा प्रयत्न करा. एक कॉम्पुटर एक्स्पर्ट आणि मास्टरच काम हेच असत. की त्याला कॉम्पुटर संधर्भात सर्व माहिती असायला हवी. आणि कॉम्पुटर मध्ये कोणत्याही प्रकारची खराबी असेल तर ती सोप्प्या पद्धतीने ठीक करू शकेल. तर अश्यात तुमच्यासमोर कोणत्याही कॉम्पुटर संधर्भात प्रॉब्लेम असेल तर त्याला ठीक करायचा प्रयत्न करा. 
                                      
 आणि तुमच्याश्यान ठीक होत नसेल तर इंटरनेट ची मदत घेऊ शकता. इंटरनेट मध्ये तुम्हाला सर्व उपाय भेटून जातील. कोणत्याही प्रकारे त्या कॉम्पुटर प्रॉब्लेमला ठीक करायचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त तुमचे मित्र अथवा परिवाराच्या कॉम्पुटर लॅपटॉप मध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली असेल, तर त्याला ठीक करायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही त्यांना त्याचा उपाय सांगा आणि यामुळे तुमचा अनुभव ही वाढेल. आणि नंतर कधी तशी समस्या निर्माण झाली तर तुम्ही सोप्प्या पद्धतीने ठीक करू शकता. ते पणं कोणाचीही मदत न घेता अथवा इंटरनेटची मदत न घेता.

ऑनलाइन ब्लॉग आणि व्हिडिओ पाहू शकता. एक कॉम्पुटर जिनियस रोज नवनवीन गोष्टींचं ज्ञान घेत असतो. ऑनलाईन ब्लॉग आणि विविध तंत्रज्ञानावर आधारित लेख वाचून, व्हिडिओ बघून, कॉम्पुटर आणि इंटरनेट संधर्भात जिथून त्यांना माहिती भेटेल तिथून माहिती घेतात. तर तुम्हाला ही बनायचं आहे एक कॉम्पुटर मास्टर तर तुम्हाला सुद्धा रोज कॉम्पुटर संधर्भात माहिती घ्यावी लागेल. ब्लॉग वाचायला लागतील तसेच व्हिडिओ पाहायला हवेत. जेणेकरून तुमचं ज्ञान रोज वाढत जाईल. आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कॉम्पुटर संधर्भात खूप चांगली माहिती सुद्धा होऊन जाईल कॉम्पुटरच्या अधिक कौशल्या संधर्भात सुद्धा जाणून घेऊ शकता. जस की कॉम्पुटर प्रोग्रामिंग लँग्वेज, सॉफ्टवेअर कसे बनतात? नेटवर्किंग अश्या गोष्टी जाणून घेऊ शकता. जर तुम्ही शाळेत शिकत असतील तर माझा सल्ला हाच असेल. की तुम्ही दहावी झाल्यानंतर अकरावीला कॉम्पुटर सायन्स विषय निवडा. आणि जेंव्हा तुम्ही बारावी पास व्हाल तेंव्हा कॉम्पुटर सायन्स इंजिनियर हा विषय निवडावा लागेल. जेणेकरून तुम्ही याच संधर्भात अभ्यास करू शकाल. तर या डिग्री मध्ये तुम्हाला याच गोष्टींसंधर्भात शिकवले जाते. तर जर तुम्हाला कॉम्पुटर एक्स्पर्ट बनायचं आहे. तर ही डिग्री तुमच्यासाठी खूप फायद्याची ठरू शकते. तर ही होती काही कॉम्पुटर एक्स्पर्ट होण्यासाठी लागणारी ज्ञान सामग्री या गोष्टी करून तुम्ही नक्की कॉम्पुटर एक्स्पर्ट बनू शकता. 

 अश्याच वैविध्यपूर्ण ज्ञानावर आधारित गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या धन्यवाद!
                                                                                                      - Ramdas Joshi 

Comments