चला थोड सोशल मीडिया बद्दल जाणून घेऊ...
सोशल मीडिया हा शब्द काही आपल्याला परका नाही, तसेच तो आपल्याला माहीत नाही अस ही नाही. त्याला आत्ता पर्यंत आपण बहुतेक उत्कृष्ट रित्या जाणून घेतलेलं आहे. आणि आत्ता तर या प्लॅटफॉर्म वर लोकसंख्येची इतकी गर्दी होऊ लागली आहे, की त्याचा वापर आणि माहिती नसलेला कोणताही व्यक्ती आपल्याला पाहायला भेटणार नाही. लहान मुलांपासून ते वयोवृध्द व्यक्तीपर्यंत याचा प्रसार झालेला आपण बघत आहोत. परंतु या सोशल मीडियावर चालत तरी काय केवळ शेअरिंग चॅटिंग की अजुन काही जे आपल्याला माहीत नाही. तर याचाच विचार आपण या लेखामध्ये करणार आहोत.
खरे तर जेंव्हापासून आपल जीवन या तंत्रज्ञानाला जोडले गेले आहे तेंव्हा पासून आपल्या अनेक गोष्टींना वेग प्राप्त झालेला आहे. अश्मयुगीन मानवाची परिस्थिती आणि आत्ताच्या मानवाची परिस्थिती ही जमीन आसमानाचे फरक दर्शवते हे खरे, परंतु त्यातही सध्या इंटरनेट ने जशी आपल्या जीवनात एंट्री केली. तसेच आपल जीवन एका डिजिटल स्वरूपात बदलून गेलं आहे. केवळ मानवाच्या आत्तापर्यंत लावल्या गेलेल्या शोध प्राप्तीमुळे हे शक्य झाले आहे. आत्ता प्रत्येक व्यक्तीकडे आपल्याला याच आविष्काराचा तुकडा पाहायला मिळतो. तो म्हणजे आपला स्मार्टफोन. जो दिसायला छोटा आहे परंतु संपूर्ण जगाची माहिती तो देऊ शकतो. एवढेच नव्हे तर आपल्याला अनेक सोयी - सुविधांचा लाभ या उपकरणातून घेता येतो. आपल्याला कल्पनेतून बनवलेल्या गोष्टींचा प्रसार यावर करता येतो. जो काही सेकंदात लाखो लोकांपर्यंत पोहचवू शकतो. ज्यामुळे आपल्याला प्रसिध्दी आणि चाहते प्राप्त होऊन जातात. तसेच आत्ता सध्या प्रत्येक व्यक्तीच्या वापरात असलेले सोशल प्लॅटफॉर्म, जसे की फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम. तसेच विविध शोशल ॲप आहेत. जे आपल्याला जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात. एवढेच नव्हे तर तुमच्या अनुभवाला आणि कल्पनांना यामुळे एक प्रेरणादायी भरारी मिळवून देतात. आजपर्यंत लाखो लोकांचे आयुष्य या सोशल मीडियाने बनवले आहेत. परंतु त्याचा वापर चांगल्या रीतीने केला तर. कारण प्रत्येक गोष्टीला वापरण्याची एक पद्धत असते. ती पद्धत योग्य रीतीने तुम्ही वापरली तर नक्की त्याचा फायदा हा आपल्याला अनुभवायला भेटतो.
परंतु जर त्याचा वापर चुकीच्या पद्धतीने केला तर नक्कीच त्याचा तोटा होण्याचा संभव आपल्या आयुष्यात असतो. कारण सोशल मीडिया हे सध्या मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे, अपडेट होत आहे. ज्यांचा वापर करून आपण आर्थिक कमाई सुधा करू शकतो आणि धोक्यात सुद्धा येऊ शकतो.
आपल्याला बहुदा याचा फायदाच होत असतो, परंतु त्याच्याव्दारे आपल्याला फसवणुकीचे प्रकार सुधा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. जसे की आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची लालसा दाखवून आपल्यासोबत फसवणूक होऊ शकते. तसेच आपल्याला मानसिक तणावाखाली आणून धोका पोहोचवण्याचं काम सुद्धा या सोशल मीडिया मार्फत केले जाऊ शकते. परंतु यामध्ये आपल्याला सुरक्षा कशी मिळू शकते. तर ती आपण आपल्या हुशारीने तयार करू शकतो. आपली वैयक्तिक माहिती ही कधीच कोणत्या ही अपरिचित व्यक्तीला देऊ नये. तसेच आपले खाते थर्ड पार्टी च्या हातात गेल्यावर ते आपल्या कडून सोशल मीडियावर पैश्यांची मागणी करू शकतात. तर या गोष्टींना आपण न घाबरता सायबर सुरक्षा केंद्राला कळवू शकतो
सध्याच्या काळात अनेक मुलींना सोशल मीडियावर वेगवेगळ्या धमक्या तसेच फसवणुकीचे व्यवहार या ऑनलाईन ट्रेंड वर अनुभवायला भेटत असतात. यामुळे अनेक मुली या असुरक्षित भावना तयार करून यांसारख्या प्लॅटफॉर्म वर बळी पडू शकतात. तसेच सध्या तर सोशल ॲप्लिकेशन हे अत्यंत लोकप्रियता दर्शवत आहेत, की याचा वापर मुलींना सुद्धा परिणामाच्या भोवऱ्यात खेचत आहे. तसेच याच सोशल मीडिया वर अनेक मुलींना फॉलो करून फसव्या प्रकारचा भावनिक आधार देऊन फसवणूक केली जाऊ शकते. तर या गोष्टीला आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलींनी सतर्क राहून आपल संरक्षण स्वतः करायला हवं. आणि जर कोणी कोणत्या ही सोशल प्लॅटफॉर्म वर मानसिक आत्याचार करत असेल तर अश्या गोष्टींची माहिती आपल्या वडीलधाऱ्या माणसांना देऊन यांच्यापासून सुटका करू शकता. तसेच काही वेबसाईट सुद्धा आहेत की ज्यावर तुम्ही या गोष्टींची तक्रार देऊ शकता. ज्या सुरक्षित आणि आपली तक्रार गुपित ठेवून आपली समस्या सोडवू शकतात. आपल्याला वेबसाइट हवी असेल तर आमच्या ईमेल वर कळवू शकता.
तर हा झाला या डिजिटल जगामध्ये वाईट विचाराने घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम आत्ता याचा चांगला फायदा कोणता आहे हे सुद्धा पाहू.
सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात अनेक युक्त्यांचा वापर करून प्रत्येक जण पैसे कमवत आहे. मोठ्या प्रमाणत प्रसिध्दी ही प्राप्त करत आहे. तर हे प्लॅटफॉर्म कोणते. ते इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक, यु ट्यूब, अश्या गोष्टींचा समावेश या आर्थिक कमाईच्या ट्रेंड मध्ये होतो. तसेच ब्लॉग, वर्डप्रेस यांसारख्या गुगल च्या सेवा आहेत, ज्याधून आपण लाखो रुपया पर्यंत कमाई करू शकतो. गूगल ने आपले विचार मांडण्यासाठी ब्लॉग आणि वर्डप्रेस हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचा उपयोग करून आपण लाखो वाचकांपर्यंत पोहचू शकतो. तसेच प्रसिध्दी प्राप्त करू शकतो. त्यासाठी केवळ आपल्या सुप्त गुणांच्या आधारावर आपण विविध लेखन करून जे अद्वितीय आहेत अश्या गोष्टी ब्लॉग,वर्डप्रेस वर शेअर करू शकतो. आणि ॲडसेन्स मार्फत कमाई करू शकतो. तर अश्याप्रकरे आपण आपल्या जीवनात डिजिटल सेवांचा उपभोग घेऊ शकतो. सोशल मीडियावर असणाऱ्या प्रत्येक सोयी सुविधाचा फायदा घेऊ शकतो. तर आशा आहे की आमची माहिती तुम्हाला आवडली असेल तर यासाठी फॉलो करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.
अश्याच मजेशीर आणि महत्वाच्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment