हॅलो फ्रेंड्स तुम्हाला माहीतच आहे, की मी या वेबसाईट वर तुम्हाला उपयुक्त असणाऱ्या वेबसाईट तसेच त्यांच्याशी निगडित टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येतो. ज्या वापरून तुम्ही तुमचं काम सोप्प आणि मनोरंजक बनवता, ज्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतात. तर अशा स्वरूपात मी आपल्यासाठी काही सॉफ्टवेअर घेऊन आलो आहे. जे तुम्हाला नक्की उपयुक्त ठरणार आहेत. जे वापरून तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवर एक नवीन अनुभव घेणार आहात. तसेच महत्वाचे म्हणजे सर्व सॉफ्टवेअर विनामूल्य आहेत. त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही. तर मग चला सुरुवात करूया, आणि जाणून घेऊ.
1. Anvi locker -
तुम्ही जर कॉम्पुटर मध्ये खाजगी फाईल तयार करत असाल, तर ती फाईल सुरक्षित आणि सेक्युर ठेवायची असेल, तर तुम्हाला या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे, तसेच तुम्ही तुमची खाजगी फाईल लपवून सुद्धा ठेवू शकता. त्यासाठी केवळ खालील लिंक वर क्लिक करून सोफ्टवेअर डाऊनलोड करा, आणि आपल्या कॉम्पुटर मध्ये असणाऱ्या खाजगी फाईल साठी सेक्युरिटी तयार करू शकता.
सूचना - कृपया आपण तयार केलेला पासवर्ड लक्षात ठेवावा. कारण तुम्ही लॉक केलेली फाईल त्या पासवर्डनेच उघडेल, त्यासाठी पासवर्ड लक्षात ठेवा अथवा फाईल लॉस्ट होऊ शकते.
2. Driver pack solution -
आपला लॅपटॉप अथवा कॉम्पुटर मध्ये काही समस्या निर्माण झाल्या असतील, तर हा सॉफ्टवेअर आपल्याला त्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार आहे. या सोफ्टवेअर मार्फत तुम्ही या समस्या सोडवू शकता त्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत.
➪ Wifi not working
➪ Blootooth not working
➪ Graphic driver missing
➪ Sound driver missing
तर यासारखे प्रॉब्लेम कोठे तरी आपल्या कॉम्पुटर मध्ये ड्रायव्हर मिसिंग मुळे होत असतात. तर त्यासाठी हे सॉफ्टवेअर तयार केले गेले आहे. या सॉफ्टवेअरच्या एका क्लिक वर तुम्ही या समस्या सोडवू शकता.
3. Recuva file software -
हा सॉफ्टवेअर आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कधी कधी काय होत की आपल्या कॉम्पुटर मधील अथवा मेमोरी कार्ड मोबाईल डिव्हाईस यामधील महत्वाचा डाटा, जसे की फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट फाईल यांसारख्या गोष्टी आपल्याकडून डिलीट होत असतात. तर त्या पुन्हा मिळवण्यासाठी या सॉफ्टवेअर चा उपयोग होणार आहे. त्या रिसायकल बिन मधून डिलीट झाल्या असतील, तरी सुद्धा या गोष्टी तुम्हाला मिळवता येणार आहेत. त्यासाठी केवळ तुम्हाला सॉफ्टवेअर डाऊनलोड करून त्याच्या मदतीने ज्या फाईल डिलीट झाल्या आहेत त्या फाईल मिळवू शकता. तर त्यासाठी खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा.
4. Inkscape -
हे एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे. हे त्या लोकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, जे ड्रॉविंग करण्यात रुची ठेवतात. अश्या व्यक्तींसाठी हे सॉफ्टवेअर एक महत्वाचं टूल ठरणार आहे. याद्वारे आपण आर्ट बनवू शकता, लोगो बनवू शकता. ग्राफिक्स तयार करू शकता, आयकॉन तयार करू शकता. याची खासियत अशी आहे, की हे सॉफ्टवेअरला लाईनस, मॅकओएस आणि विंडोज या तिन्ही गोष्टींच्या एसेक्स साठी हे फ्री सॉफ्टवेअर ठरणार आहे.
5. Audacity -
तुम्ही जर व्हॉईस रेकॉर्डिंग अथवा ऑडियो च काम करत असाल, तर हे सॉफ्टवेअर तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. हे जे सॉफ्टवेअर आहे हे तुमच्या व्हॉईस रेकॉर्डिंगला एडिट करण्यासाठी मदत करणार आहे. त्यासाठी यामध्ये विविध टूल उपलब्ध करून दिलेले आहेत. हे वापरून तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंगला अधिक आकर्षक बनवू शकता.
6. Auselogics duplicate file finder -
आपल्या कॉम्प्युटर मध्ये काही डूब्लिकेट फाईल तयार होतात, तर या डूब्लिकेट फाईल मुळे आपला डेटा भरला जातो. यामुळे आपल्याला कॉम्पुटर ॲक्सेस करायला समस्या निर्माण होतात. तर यासाठी हे सॉफ्टवेअर या फाईल डिलीट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. केवळ या सॉफ्टवेअरच्या मदतीने स्कॅन करून त्या सर्व फाईल डिलीट करू शकता.
7. Blender software -
या सॉफ्टवेअर मार्फत ॲनीमेटेड फिल्म्स, व्हिज्युअल इफेक्ट, थ्री डी पेंटिंग मॉडल, मोशन ग्राफिक, कॉम्पुटर गेम्स इत्यादी गोष्टी तयार करू शकता. हे एक प्रोफेशनल सॉफ्टवेअर आहे. जे वापरण्यास थोड अवघड आहे, परंतु एकदा तुम्हाला वापरता येऊ लागले तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला खूप कामी पडणार आहे. कारण तुम्ही यामार्फत कॉम्पुटर थ्री डी ग्राफिक्स तयार करू शकता. आणि सध्याच्या ओघात ग्राफिक्स डिझाईन हे वेगवेगळ्या क्षेत्रात वापरल्या जातात. तर त्यामुळे या गोष्टी आर्थिक कमाईच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त ठरू शकतात.
तर मित्रांनो हे होते काही महत्वाचे कॉम्पुटर सॉफ्टवेअर हे वापरून तुम्ही अनेक नवनवीन गोष्टी तयार करू शकता. आणि महत्वाचं म्हणजे हे सर्व सॉफ्टवेअर फ्री आहेत त्यामुळे तुम्ही या गोष्टी वापरू शकता.
अश्याच मजेशीर टिप्स आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment