Skip to main content

Learn more about the Internet through this article




मित्रांनो सध्या इंटरनेट या शब्दाने मोठ्या प्रमाणात भरारी घेतली आहे. ज्यावर आपल्याला अनेक गोष्टी सहजपणे उपलब्ध होतात. त्यामधे आपण ऑनलाइन शॉपिंग, ऑनलाइन आर्थिक व्यवहार तसेच ऑनलाइन गप्पा मारू शकतो. आणि वेगवेगळया गोष्टींची देवाणघेवाण करू शकतो, परंतु याच इंटरनेट बद्दल तुम्हाला सखोल माहिती आहे का? नक्कीच असेल परंतु सखोल माहिती नसेल तर मग त्यासाठी आजचा लेख मी तयार केलेला आहे. यामध्ये मी तुम्हाला इंटरनेट बद्दल काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तर मग चला आपण जाणून घेऊ काय आहेत त्या महत्वाच्या गोष्टी.

या शब्दाचा आणि आपला संबंध बहुदा रोज येत असतो. इंटरनेट वर एखादी वेबसाईट सर्च केल्यानंतर आपल्याला हा शब्द नक्की दिसतो. तर याचा फुल फॉर्म काय आहे हे सुध्दा आपल्याला माहीतच असेल. वर्ड वाइड वेब हा त्याचा फुल फॉर्म आहे. याला जर आपण तांत्रिक रित्या समजले, तर हा एक माहितीचा स्त्रोत म्हणावा लागेल. ज्यामधे वेगवेगळ्या प्रकारची माहिती समाविष्ट केलेली असते. जसे की फोटो व्हिडिओ एखादी महत्वाची फाईल, डेटा अश्या विविध गोष्ट त्यामध्ये समाविष्ट केल्या जातात. तर यांची लिंक सर्वरमध्ये स्टोअर केलेली असते, तसेच सेव्ह केलेली असते. ज्याला आपण एका लिंकच्या माध्यमात एसेक्स करत असतो. जसे की इंटरनेट हे एक महाकाय वृक्ष आहे ज्यामध्ये विविध माहितीच्या शाखा आहेत. जस की फोटो, व्हिडिओ, वेगवेगळे लेख, डॉक्युमेंट तर या सर्व गोष्टी या सर्व्हर वर समाविष्ट असतात. आत्ता या गोष्टींची सर्व माहिती, म्हणजेच या सर्वांचे URL. तसेच या गोष्टी कश्या चालवायच्या? याची माहिती प्रामुख्याने ऑनलाइन या WWW word wibe web मध्ये समाविष्ट केलेली असते. आणि याला चालवायचं म्हणजे त्यासाठी एक पत्ता लागतो. पत्ता म्हणजेच address म्हणजेच URL ची गरज असते. तर यामधे साधी सरळ गोष्ट आहे, की आपण इंटरनेट वर कोणत्याही साईटवर क्लिक करतो अथवा कोणती ही फाईल डाऊनलोड करत असतो, व्हिडिओ बघत असतो, लेख वाचतो. तर त्याचा एक विशिष्ट URL असतो, पत्ता असतो. ज्याला आपण यू आर एल बोलतो. 
                                                     
आणि URL चां फुल फॉर्म uniform resource locator असा आहे. जस की आपल्याला याच्या नावावरूनच समजत, की एखाद्या स्त्रोताची माहिती शोधून काढणे अथवा दिशा निर्देशित करणे. आत्ता ही जी काही माहिती असते. तर ती या WWW मध्ये समाविष्ट असते. आत्ता आपण तिथे कोणत्याही वेबसाईटला चालवतो, तेंव्हा त्याठिकाणी आपल्याला दोन गोष्टी अवश्य दिसतात. त्या म्हणजे HTTP आणि दुसरी म्हणजे HTTPS. आत्ता यामध्ये कोणता फरक आहे? तर HTTP याचा फुल फॉर्म असतो hyper text transfer protocol जस की त्याच्या नावावरूनच आपल्या लक्षात आले असेल की, हे एखादी फाईल अथवा डॉक्युमेंट यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवण्याच काम करतात. त्याच प्रमाणे प्रोटोकॉलचा अर्थ आहे setup rool. तर याची सोप्पी व्याख्या अशी आहे, की इंटरनेट रुपी दुनियेमध्ये आपण एखादी फाईल अथवा टेक्स्ट पाठवतो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, तसेच आपण एका फाईलला दुसऱ्या कॉम्पुटर मधून ॲक्सेस करतो. तर ती जी फाईल आहे तर ती ट्रान्स्फर होत असते. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. तर यासाठी एक सेटअप रुल बनवला जातो इंटरनेट वर, जसे की उदाहरणार्थ तुम्ही माझा हा लेख वाचत आहात, तर हा लेख तुमच्यापर्यंत कसा आला? तर याच लिंक एका लिंक द्वारे. तसेच तुम्ही त्याला ॲक्सेस करू शकता. तर त्यासाठी इंटरनेट वर एक रूल बनवला गेला आहे. 
                                 
                     तर या ज्या काही गोष्टी असतात त्या सर्व प्रामुख्याने https वर येतात. आणि याच्याच माध्यमातून आपण इंटरनेट ॲक्सेस करत असतो. नाहीतर अस म्हणू, की ज्या काही फाईल आहेत त्या एका जागेतून दुसऱ्या जागी प्रवाहित होतात. सर्वर आणि क्लाएंट यांच्या मध्ये तर हे सर्व मुळात एक नियम पाळत असतात तेंव्हाच इंटरनेट काम करत असतो. समजा आपण या इंटरनेट च्या दूनियेमध्ये एक ऑनलाइन फॉर्म भरला. आणि त्याच्यात काही माहिती टाकली, तर त्याठिकाणी फॉर्म भरून सबमिट केला आणि त्याचा जो काही डेटा आहे. तर तो आपण सर्वर वर पाठवला. तर जो डेटा आहे तो एका जागेवरून दुसऱ्या जागी प्रवाहित होईल. तर आपण अस मानू की या ठिकाणी एखादा थर्ड पार्टी वाला माणूस बसलेला आहे. त्याने जर मध्येच आपला डाटा चोरला तर... त्यासाठी जी काही सुरक्षा आपल्याला दिली जाते,तर ती https नुसार सुरक्षित मानली जाते. कारण आपण जे काही फॉर्म भरत असतो. त्यामध्ये काही महत्वाची कागदपत्रे आपण अपलोड करत असतो, जसे की पॅनकार्ड, आधार कार्ड, बँक खात्याचे तपशील अश्या गोष्टी आपण सर्वर वर पाठवत असतो. तर त्या ठिकाणी आपला जो काही डेटा आहे. तो https मध्ये समविष्ट होतो. तर त्या ठिकाणी तो डेटा secured करण्यासाठी https लावले जाते. म्हणजेच आपण जो काही डेटा पाठवत आहात. तो पूर्णपणे सुरक्षित आहे. त्या डेटा ला कोणताच थर्ड पार्टी वाला व्यक्ती चोरू शकत नाही. तुम्ही जो डेटा एका ठिकाणाहून पाठवत आहात तो डेटा डायरेक्ट सर्वर कडेच जाईल. त्याला मध्येच कोणीच खोलू शकत नाही अथवा तोडू शकत नाही. म्हणजेच तुमचा जो काही डेटा आहे तो एका जागेतून दुसऱ्या जागेवर पाठवत आहात. तेंव्हा तो पूर्णपणे सुरक्षित आहे, तसेच तुम्ही एक गोष्ट अनुभवली असेल, ज्या ठिकाणी आपण पेमेंटच काम करत असतो, जसे की तुम्ही तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाईन पेमेंट करतात, तेंव्हा त्या सगळ्या वेबसाईट वर आपण पाहिले असेल, की त्याठिकाणी एक हिरव्या रंगामध्ये https असे दिसेल. ज्याचा अर्थ असा आहे की ती वेबसाईट वापरण्यास सुरक्षित आहे. त्याठिकाणी तुम्ही जी काही माहिती अपलोड कराल ती सुरक्षित असेल कोणीच त्याला मध्येच चोरू शकत नाही.
इंटरनेट मध्ये तुम्ही या दोन शब्दाना खूप वेळा ऐकल असेल, परंतु तुम्हाला माहीत आहे का? याचा अर्थ काय होतो. चला मी तुम्हाला सोप्प्या पद्धतीने समजाऊन सांगतो. उदा तुम्ही एखाद्या मोबाईल शॉप मध्ये गेला आहात तर त्याठिकाणी खूप सारे मोबाईल आजूबाजूला लावलेले असतात. तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या दुकानदाराला बोलतात की मला हा हा मोबाईल द्या. तो दुकानदार तुम्हाला मोबाईल दाखवतो. तर याठिकाणी तुम्ही त्या दुकानदारा साठी कोण असाल? client असाल. तर याठिकाणी तुम्ही त्याच्याकडे काय करता तर विनंती करता. त्यामुळे तुम्ही काय समजले जाल client. आणि त्या विनंतीला दुकानदार प्रतिक्रिया देतो. त्याला म्हणतात सर्व्हर. तर याठिकाणी सेम तुम्ही ब्राउझर वर जाता. तुम्ही विनंती करता की एखादी माहिती द्या आणि तुमच्या मागणीवर ब्राउझर तुम्हाला माहिती देतो. तर त्याला म्हणायचं सर्वर. तर याठिकाणी मागणी आणि प्रतिक्रिया या दोन्ही गोष्टी होत असतात. म्हणजेच आपण प्रश्न विचारतो आणि तो तुम्हाला उत्तरे देतो. यासारखच इंटरनेट वर काम होत असत. तर तुम्हाला ज्या गोष्टी हव्या असतात त्या तुम्ही ब्राउझर मधुन मिळवता. तर या सर्व गोष्टी एखाद्या सर्वर मध्ये सेव्ह असतात. आणि जेंव्हा तुम्ही त्या गोष्टी मिळवण्यासाठी लिंक वर क्लिक करता. तेंव्हा त्या तुमच्या पुढे उपलब्ध होतात.
इंटरनेटचा अनुभव घेत असताना तुम्ही या शब्दाचा अनुभव नक्की घेतला असेल, अथवा ऐकले असेल. तर याचा अर्थ होतो Internet protocol address. हा एक प्रकारचा पत्ता असतो. अथवा अस म्हणू की अद्वितीय नंबर असतो. जो प्रत्येक डिव्हाईस साठी वापरला जातो. जसे की कॉम्प्युटर, मोबाईल, प्रिंटर, स्कॅनर, वाय-फाय तसेच विविध इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस असतात जे इंटरनेट शी जोडलेले असतात. त्यांच्यासाठी हा एक अद्वितीय नंबर दिला जातो. याच address मुळे तुमची या इंटरनेट रुपी दुनियेमध्ये ओळख होते. आणि तुम्ही इंटरनेट वर कोणतीही गोष्ट चालवत असता. तेंव्हा तुम्हाला कळत, की हा युजर आहे हा ह्या देशाचा आहे, याचा ip address हा आहे. आणि खास हा जो काही आयपी ऍड्रेस दिला गेलेला आहे. त्याने तुम्हाला समजत की त्या device साठी अथवा इंटरनेटसाठी हा आयपी ऍड्रेस दिला गेला आहे. तर याठिकाणी बऱ्याच वेळा तुम्ही फसवेगिरी संधर्भात ऐकल असेल. तेंव्हा आपल्याला समजत की कोणत्या कॉम्प्युटरच्या माध्यमातून आपल्याला हॅक केलेलं आहे. हे पण कशाच्या सहाय्याने तर या आयपी ऍड्रेसच्या माध्यमातून तर मग ही होती काही आजची इंटरनेट बद्दल माहिती तर मग शेअर करा आणि आपला अभिप्राय जरूर कळवा 

 तर अश्याच काही महत्वाच्या टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
                                                 -   Ramdas joshi 

Comments