Skip to main content

Technical web application tricks and tips


आज आपण आपल्या स्मार्टफोन मधील काही महत्वाच्या ट्रिक्स आणि टिप्स बघणार आहोत. ज्या तुम्हाला अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त ठरणार आहेत. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या मोबाईल बद्दल अधिक जाणून घेणार आहात. तर मग चला जाणून घेऊ काय आहेत या ट्रिक्स आणि टिप्स.

1. Crome i button -

                      आपण आपल्या रोजच्या जीवनात, आपल्या मोबाईल मध्ये अनेक वेबसाईट या क्रोम मधून चालवत असतो. या वेबसाईट सुरक्षित असतात का नाही?, याबद्दल कोणतीही माहिती आपल्याला नसते. तर या गोष्टीसाठी क्रोम ॲप आपल्याला सुरक्षितता प्रदान करत असते. जेंव्हा आपण आपल्या क्रोम ब्राउझर मध्ये एखादी वेबसाईट टाकून माहिती घेण्याचा प्रयत्न करू, त्याआधी ही गोष्ट जरूर करा. क्रोम ब्राउझर मध्ये वेबसाईट टाकल्यावर बाजूला तीन डॉट्स दिसतील, त्यावर क्लिक करा आणि त्याठिकाणी असलेले i बटण यावर क्लिक करा. त्याठिकाणी तुम्हाला स्क्रीन वर दिसेल की वेबसाईट सुरक्षित आहे, की असुरक्षित. तर आपण वेबसाईट खोलायच्या अगोदर या गोष्टीचा अवलंब अवश्य करा. आणि आपली सुरक्षा अधिक चांगली बनवा. 


         ➪  Browse any website

            ➪   Click on three dots

         ➪   Next you can see website security


2. Mobile code tricks - 

                          ही ट्रिक्स अतिशय मजेशीर आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कधी कधी काय होत की आपण आपला मोबाईल आपल्या मित्राकडे देतो. त्यावेळी तो कोणकोणत्या गोष्टी आपल्या मोबाईल मध्ये करतो? कोणते ॲप चालवतो? याची माहिती आपल्याला होत नाही. तर आजपासून तुम्हाला ही माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी केवळ आपल्या मोबाईल मधील डायल पॅड ओपन करा. आणि पुढील कोड प्रविष्ट करा आणि जाणून घ्या. तुम्हाला पुढीलप्रमाणे तीन पर्याय दिसतील.

            ➪ Phone information

               ➪ Usage statistics

           ➪   Wifi information

असे तीन पर्याय आपल्याला दिसतील. त्यामधील usage statistics या पर्यायावर क्लिक करा. आणि पुढील माहिती जाणून घ्या. आपल्या मित्राने अथवा कुणी तरी काय काय केले आहे. जाणून घ्या त्यासाठी खालील कोड प्रविष्ट करा. 

             ⏩  *#*#4636#*#*

               

3. Google lens - 

                 कधी कधी काय होत की आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात. जसे की एखाद्या वनस्पती चे नाव, अथवा एखाद्या वस्तूचे नाव, प्राण्याचे नाव. अश्याच वेगवेगळ्या स्वरूपात असलेल्या गोष्टींची नावे आपल्याला माहीत नसतात. तर ती कशी माहित करून घ्यायची तर ती अश्याप्रकरे, त्यासाठी केवळ आपल्याला मोबाईल मध्ये गूगल लेन्स हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. आणि ते डाऊनलोड केल्यावर त्यामधे ज्या वस्तूचे अथवा एखादा घटक याच नाव माहीत नसेल, आणि माहित करून घ्यायचे असेल. तर त्यासाठी केवळ तुम्ही तुमच्या मोबाईल मधील गुगल लेन्स ॲप ओपन करायचे आहे. आणि त्यामध्ये असणाऱ्या कॅमेरा मधून त्या घटकाचं छायाचित्र क्लिक करायचे आहे. क्लिक करताना तुम्ही ज्या वस्तूचे नाव अथवा माहिती जाणून घेणार आहात त्या वस्तूवर क्लिक करून, फोटो घ्या. तुम्हाला तुमच्या मोबाईल वर त्या फोटोच्या खाली त्याच्याशी संबंधित माहिती आणि फोटो दिसतील, तर ते तुम्ही पाहू शकता. अश्या प्रकारे याचा उपयोग करू शकता. हे ॲप गूगल चे आहे. त्यामुळे कोणतीही शंका बाळगू नका ॲप वापरण्यास सुरक्षित आहे.

 

4. Google go -

              कधी कधी काय होत की, आपल्याला खूप घाईमध्ये एखाद्या गोष्टीचा निकाल पाहण्याची सवय असते. वेटींग करूच शकत नसतात. तर हे ॲप खास त्यांच्यासाठी आहे, जे घाई मध्ये आहेत. या एप्लिकेशन्स वर तुम्हाला विविध ॲप पाहायला भेटतील. तसेच तुम्ही फास्ट ब्राउझिंग करू शकतात. तुम्हाला छायाचित्रे मिळवायची असतील, तर तुम्ही यावर मिळवू शकता. यावर विविध कॅटेगरी दिलेली असते वेब, इमेज अश्या स्वरूपात, तर त्याच्यावर क्लिक करून तुम्ही माहिती घेऊ शकता. त्यासाठी केवळ खालील लिंक वर जाऊन ॲप डाऊनलोड करायचे आहे. ॲप गूगल चे आहे त्यामुळे 100% विश्वसनीय आहे तुम्ही वापरू शकता.

 

     नक्कीच तुम्हाला या ट्रिक्स आणि टिप्स जाणून  आनंद मिळाला असेल. 

अश्याच मजेशीर वेबसाईट टीप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील, तर आमच्या संकेतस्थळावर भेट द्या. धन्यवाद! 

                                                                                                               - Ramdas Joshi 

Comments