Skip to main content

Top 9 I.T career courses and opportunities




आयटी फिल्ड मध्ये सध्या आपला भारत खूप पुढे जात आहे. आणि अश्या परिस्थितीत आयटी सेक्टर मध्ये मोठ्या प्रमाणात संभावना ऊपलब्ध होत आहेत. म्हणजेच या फील्ड मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन कोर्स केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही जर आयटी क्षेत्राकडे तुमच्या भविष्याची वाटचाल करत असाल, तर या आयटी क्षेत्रावर आधारित कोर्स बद्दल तुम्हाला माहीत असायला हवे. त्यामुळे मी आज तुम्हाला अश्याच काही आयटी क्षेत्रावर उपलब्ध असलेल्या कोर्स संधर्भात माहिती सांगणार आहे. तर मग चला जाणून घेऊ आयटी सेक्टर मधील या कोर्सेस बद्दल.
    

जर तुम्ही स्वातंत्र्य रित्या काम करू इच्छित असाल आणि तुम्हाला आवडत असेल, तर वेब डिझायनिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकेल. या ट्रेनिंग कोर्स मध्ये एखाद्या वेब साईटला बनवण्यापासून ते संतुलित ठेवण्यापर्यंत अनेक घटकांशी सौदे करावे लागतात. या कोर्स मध्ये आपल्याला एच.टी.एम.एल, पी.एच.पी तसेच जाव्हा स्क्रिप्ट या संक्षिप्त भाषा याचबरोबर फोटोशॉप आणि वर्डप्रेस वर सुद्धा काम करण्यास शिकवले जाते. हा एक अल्पकालीन प्रोफेशनल कोर्स आहे. आणि याला केल्यानंतर तुम्ही कोणत्याही वेब डिझायनिंग कंपनी साठी काम करू शकता. आणि स्वतंत्रपणे सुद्धा काम करू शकाल. जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुमचं सुरुवातीचं वेतन दहा ते पंचवीस हजार पर्यंत मिळून जाईल. आणि अनुभव घेतल्या नंतर तुम्ही सहजरीत्या महिन्याला पंचवीस ते चाळीस हजार याप्रमाणे कमवू शकता.
 
म्हणजेच तुम्ही वेबसाईट डिझाईन, मोबाईल आणि ॲप्लिकेशन या क्षेत्रात तुमचं करियर बनवू इच्छित असाल, तर हा कोर्स खास तुमच्या साठी आहे. कारण UI म्हणजेच user interface आणि UX म्हणजेच user experience तसेच डिझायनर डेव्हलपर आणि आर्किटेक्ट, युजर रिसर्च या गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे या क्षेत्रात प्रमाणित कोर्स करून टेक्नॉलॉजीकल कंपनी आणि सॉफ्टवेअर ऑर्गनायझेशन मध्ये नोकरी मिळवू शकता. एक UX डेव्हलपर कोड आणि व्हिज्युअल डिझायनिंग टूल्सच्या मदतीने वेब एप्लिकेशन्स आणि वेब पेजसला प्लॅन डिझाईन आणि डेव्हलप करतात. आणि UI डेव्हलपर फ्रंटिंग टेक्नॉलॉजी चा उपयोग करून क्रिएटिव्ह सॉफ्टवेअर डिझाईन कॉन्सेप्ट आणि कल्पनेला वास्तविक स्वरूपात भाषांतरित करतात. अश्याप्रकरे या कोर्स मध्ये तुम्ही तुमची जागा ठरवू शकता.

मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलमेंट ला पार्ट टाईम नोकरी प्रमाणे सुद्धा केले जाऊ शकते, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे वेगवेगळे एप्लिकेशन्स तयार करू शकता. आणि ते प्ले स्टोअर वर लॉन्च करू शकता. आणि तुम्हाला वाटल तर एखाद्या कंपनी मध्ये ॲप डेव्हलपर म्हणून काम सुद्धा करू शकता. या क्षेत्रामध्ये किती प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे, याचा अंदाज तुम्ही इतर एप्लिकेशन्स बाबतीत घेऊ शकता. जसे की ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम आणि यू ट्यूब यासारखे सोशल मीडिया ऍप आणि गेम तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी करतात. तर अश्यामध्ये मोबाईल ॲप डेव्हलपर म्हणून तुमचं भविष्य उजळत्या दिशेकडे स्थलांतरित होऊ शकते.
 
ही टेक्नॉलॉजी नॉन आयटी अनुभवासाठी प्रसिद्ध असा कोर्स आहे. cisco चे पाच प्रमाणित सर्टिफिकेट आहेत. ते पुढीलप्रमाणे एन्ट्री, असोसिएट,प्रोफेशनल एक्स्पर्ट आणि आर्किटेक्ट या सर्टिफिकेट पातळी सोबत जे विद्यार्थी ग्रॅज्युएशन करून, पास होतील. त्यांच्यासाठी नोकरी आणि वेतन संधर्भात चागल्या प्रमाणात संधी उपलब्ध होऊ शकतात.
 
यामध्ये एक्स्पर्ट कम्युनिकेशन, बिझनेस समजदारी, स्क्रिप्टींग नॉलेज ऑफ सेक्युरीटी, मोबाईल ॲप सारखे वेगवेगळे चाचणी प्रकार समाविष्ट असतात. सॉफ्टवेअर टेस्टिंग, व्हेरिफिकेशन आणि व्हॅलीडेशन यांची प्रोसेस असते. व आयटी सेक्टर मध्ये टेस्टिंग एक महत्वाचा डोमेन असतो. त्यामुळे तुम्ही जर अधिक प्रमाणात प्रमाणित कोर्स करू शकत असाल. तर तुम्हाला सॉफ्टवेअर टेस्टरची नोकरी मिळू शकते. या कोर्स ला करण्यासाठी कँडीडेट रेग्युलर आयटी ग्रॅज्युएट होन महत्वाचं आहे.
 
युजर मॅनेजमेंट सिस्टीम, सिक्युरिटी रिस्क मॅनेजमेंट आणि पॅकेज इंस्टॉलेशन सारख्या उपक्रमांमध्ये रुची ठेवणाऱ्या विद्यार्थांसाठी सिस्टीम अडमिनिस्ट्रेशन एक खूप चांगला पर्याय आहे. आणि कॉम्पुटर सायन्स मध्ये चार वर्ष पदवी प्राप्त केल्यानंतर मिळणारा हा कोर्स अत्यंत महत्वपूर्ण ठरतो. कारण यामध्ये मिळणारा सॅलरी पॅकेज सुद्धा मोठा असतो.

सगळ्या दूनियेप्रमाने भारतामध्ये सुद्धा ॲनिमेशन्स आणि ग्राफिक्स इंडस्ट्री ने आपली पक्की ओळख तयार केलेली आहे. अश्यामध्ये या क्षेत्रात काम करण्यासाठी डिप्लोमा आणि ग्रॅज्युएशन कोर्स करू शकतात. यामध्ये तुम्ही तुम्ही तुमच्या रुची नुसार वेब डिझायनिंग व्हिज्युअल इफेक्ट यांसारखे अल्पकालीन कोर्स सुद्धा करू शकतात. हे कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे सिनिअर सेकंडरी सर्टिफिकेट आणि कॉम्प्युटरिंग संधर्भात मूलभूत ज्ञान असणे महत्वाचं आहे.
 
मोबाईल सेक्टरच्या वाढीबाबत पाहून मोबाईल एप्लिकेशन्स डेव्हलपमेंट मध्ये चांगल भविष्य निर्माण केलं जाऊ शकत. हा कोर्स करण्यासाठी तुमच्याकडे जाव्हा स्क्रिप्ट आणि सी.प्लस.प्लस सारख्या भाषांची ओळख असायला हवी.

म्हणजेच डेटा बेस ॲडमिनीस्ट्रेशन एक असा कोर्स आहे, जो आयटी आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचा एक संतुलित भविष्याचा पर्याय तुम्हाला देऊ शकतो. डेटा बेस ॲडमिनीस्ट्रेशन ह्यूज डेटा फाईलला बनवण्यासाठी मॅनेज आणि आणि मेन्टेन करण्यासाठी जोडला आहे. डी.बी.ए कोर्स करण्यासाठी कोणती किमान पात्रता आवश्यक नसते, परंतु कॉम्पुटर मध्ये रेग्युलर डिप्लोमा नाहीतर ग्रॅज्युएशन केल्यानंतर नोकरीसाठी अर्ज करणे जास्त सोप्पे होते. 

 तर मित्रांनो हे होते काही आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध कोर्स, जे करून तुम्ही तुमच्या धेय्याची शिखरे ओलांडू शकता. आणि तुमचं भविष्य एका उजळत्या दिशेला नेऊ शकता. 

 तर अश्याच गोष्टींसाठी तसेच टेक्नॉलॉजी वर आधारित ट्रिक्स आणि टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
                                                                                                                     - Ramdas Joshi 

Comments