वेबसाइट कशी काम करते
इंटरनेट हा एक असा घटक आहे, ज्याद्वारे आपण अनेक गोष्टींचा शोध अभ्यास त्याच्यातून प्राप्त करत असतो. गुगल वर अनेक अश्या वेबसाईट आहेत. ज्यामधील काही माहित नाही, तर काही माहित आहेत. ज्या आपल्याला माहीत आहेत ज्यांचा उपयोग आपण रोजच्या जीवनात करत असतो. ज्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारे माहिती प्रदान करत असतात. आपण एक क्लिक करायला उशीर आहे की तोपर्यंत आपल्यासमोर गूगल हजारो रिझल्ट हजर करतो. त्यामधील आपल्याला लागणाऱ्या वेबसाईट वर आपण क्लिक करतो, आणि आपल्याला हवी असलेली माहिती आपण मिळवतो. परंतु कधी विचार केला आहे का आपण या वेबसाईट कश्या तयार होतात? कोणत्या पद्धतीने बनतात ज्या आपल्याला गूगल वर सहजरीत्या उपलब्ध होतात.
तर याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. जी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती ठरणार आहे. तर चला समजून घेऊ कशी बनते वेबसाईट.
वेबसाईट म्हणजे काय -
वेबसाईट म्हणजे एक असा संच, ज्यामधे आपल्याला हवी असलेली माहिती स्थित असते. ज्याचे अनुसरण केल्यावर आपल्याला आपल्या शोध प्रक्रिये संबंधित माहिती प्राप्त होते. तसेच ती एखाद्या यू आर एल च्या स्वरूपात असते.
वेबसाईट कशी तयार होते -
वेबसाईट तयार करण्यासाठी मुख्य म्हणजे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कोडींग आणि डीकोडिंग. सर्वप्रथम आपण या दोन संकल्पनांना समजून घेऊ. कोडींग आणि डीकोडिंग
कोडींग -
आपण ज्या काही वेबसाइट्स ना भेट देतो. त्या कश्या पद्धतीने बनतात तर कोडींग या गोष्टीच्या आधारे बनतात. ते कसे तर मनुष्याला ज्याप्रमाणे ओळखण्यासाठी विशिष्ट खुणा आहेत. जसे की डोळ्यांचा रंग, त्यांची उंची, आणि त्याच्या पेशी हे घटक मनुष्य असल्याची ओळख प्रदान करतात. त्याचप्रमाणे या वेबसाईट कोडींगच्या माध्यमातून तयार केलेली असते. ज्याला संक्षिप्त भाषेत एच टी एम एल कोड अस बोलतात. ही भाषा एक प्रोग्रामिंग भाषा आहे. जी कोडींगच्या स्वरूपात पाहायला भेटते. त्याचप्रमाणे वेबसाईट डेव्हलपरला वेबसाईट पेज बनवण्यास योजना प्रदान करते. मग ते मजकूर स्वरूपात असो नाहीतर व्हिज्युअल स्वरूपात असो. ते सर्व कोडींगच्या स्वरूपात लिहलेले असतात. तुम्ही जेंव्हा वेबसाईट वर प्रवेश करता, तेंव्हा तुमचा स्मार्टफोन अथवा संगणक हे वेबसाईट ब्राउझ करण्यासाठी एक विशिष्ट ब्राउझर वापरत असतो. वेब ब्राउझर चे तसे अनेक प्रकार असतात. फायर फॉक्स, सफारी तसेच तुम्ही वापरत असलेले क्रोम जे सध्या अत्यंत लोकप्रिय आहे. तर अश्या टूल्सच्या माध्यमातून आपण वेबसाइट्स ना भेट देत असतो.
डीकोडिंग -
वेबसाईट मध्ये जी कोडींग केलेली असते. जे पृष्ठ तयार करण्याकरता वेब डेव्हलपरने वापरलेले असतात. तर त्यामधील कोडींग ब्राउझ केल्यानंतर डिकोड स्वरूपात तयार होते. आणि मग आपण ब्राउझ केलेला ॲड्रेस योग्य पद्धतीने पहायला मिळतो.
आपली वेबसाईट कुठे साठवली जाते -
खर तर आपण आपल्या जीवनातील महत्वाच्या साधनसामग्री या योग्य पद्धतीने साठववून ठेवतो, जेणेकरून ती कुठे हरवू नये, तसेच आपल्याला भविष्यात ही त्याचा अनुभव घेता येईल. तर अश्याच पद्धतीने आपल्या वेबसाईट या साठवल्या जातात, ज्याला वेब होस्टिंग असे बोलतात. तुम्हाला माहीतच आहे गूगल वर आपण तयार केलेली वेबसाईट ही सर्च केल्यावर आपण इग्नोर करतो. परंतु तोच त्या वेबसाईट चा यू आर एल टाकल्यावर आपल्याला तेच पृष्ठ पाहायला मिळेल. तर ते कुठे साठवलेले असतात. तर त्यासाठी होस्टिंग ही व्यवस्था आपल्याला या डिजिटल जगामध्ये अनुभवयास मिळते. होस्टिंग म्हणजे एखाद्या सुरक्षित सर्व्हरचा समूह असलेल्या कंपन्यांकडे ते व्यवस्थापित करण्यासाठी दिले जातात. ते त्यासाठी मूल्य आकारतात तर काही विनामूल्य असतात. जसे की आपल्या फेसबूक ची होस्टिंग विनामूल्य जी त्या वापरकर्त्यांना विनामूल्य सेवा प्रदान करते.
डोमेन म्हणजे काय -
समजा मी तुम्हाला सांगितले की माझ्या घरी या, आणि तुम्ही अजून कधीच माझं घर पाहिले नसेल तर मग? तुम्हाला माझ्या घरी कश्या रीतीने यायचे हे समजणार नाही. तसेच तुम्ही गोंधळात पडाल. तर अस होऊ नये म्हणून मी तुम्हाला माझा पत्ता देणार ज्याच्या माध्यमातून तुम्ही माझ्या घरापर्यंत पोहचू शकाल. तसच या वेबसाईटच्या बाबतीत आहे. तुम्हाला वेबसाईटचा पत्ता च नाही दिला तर तुम्ही तिथपर्यंत पोहचू शकणार नाहीत. त्यामुळे तुम्ही तयार केलेली वेबसाईट ही अधिकतर लोकांमध्ये प्रसारित व्हावी. यासाठी तुम्हाला उत्कृष्ट डोमेन नाव खरेदी करावे लागेल. जे तुम्हाला अनेक शोधकांपर्यंत पोहोचवेल. तसेच हे डोमेन विनामूल्य स्वरूपात आणि मुल्याच्या स्वरूपात आपल्याला मिळू शकतात. www हे डोमेन उत्कृष्ट डोमेन आहे जे तुम्हाला अनेक वाचकांपर्यंत पोहोचवते. आणि उच्चतम रँकिंग राखण्यासाठी उपयुक्त ठरते.
Step by step learn.
User - website visitors enter website address
browser - browser URL
website - URL webpage
main server - Store Statics sites file
DNS server - tranclate human, readable address to a machine readable ip address
अश्याच मजेशीर वेबसाईट टीप्स आणि ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas joshi

Comments
Post a Comment