हॅलो फ्रेंड्स जर तुम्ही डिजिटल मार्केटर असाल अथवा डिजिटल मार्केटिंग शिकत असाल, तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे. कारण मी या लेखामध्ये काही डिजिटल मार्केटिंग संबंधित टूल्स आहेत, ज्यासांधर्भात यामध्ये सखोल माहिती देणार आहे. आणि हे टूल्स तुम्ही डाऊनलोड करू शकता. प्ले स्टोअरच्या माध्यमातून तसेच वेबसाईट सुद्धा मी देणार आहे. तर या वेबसाईट वापरून तुम्ही हे टूल्स वापरू शकता. तर मग चला कोणते टूल्स आहेत, आणि ते कसे काम करतात, आणि त्यांचा उपयोग काय आहे. हे जाणून घेऊयात.
1. Canva
जे लोक डिजिटल मार्केटिंग वर आधीपासून कार्यरत आहेत. त्या लोकांना याबद्दल अधिक माहिती असेल, की याचा वापर डिजिटल मार्केटिंग मध्ये कसा होतो. कॅनव्हा हे एक ग्राफिक्स डिझाईनिंग टूल्स आहे. जे तुम्हाला तुमच्या ब्लॉगसाठी, वेबसाईट अथवा कोणत्याही डिजिटल मार्केटिंग प्लॅटफॉर्म साठी फ्री ईमेजेस तयार करण्यासाठी मदत करते. यामधे तुम्ही तुमच्या यू ट्यूब चॅनल साठी thumbnails तसेच विविध प्रकारात लोगो, पॅम्पलेट तयार करू शकता, चॅनल आर्ट तयार करू शकता. तसेच यामध्ये असणारे पॅम्पलेट हे आधीच बनवले गेलेले आहेत. त्यांना एडिट करून तुम्ही यांचा वापर करू शकता. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करू शकता.
2. Vidiq
हा जो टूल्स आहे तर हा टूल्स मी त्या लोकांना सुचवू इच्छितो, जी लोकं यूट्यूबर आहेत. ज्यांचा चॅनल आहे, तसेच व्हिडिओ मार्केटिंग करत आहेत. तर तुम्हाला या टूल्स बाबत जरूर माहिती असायला हवी. तर या टूल्स मार्फत तुम्ही विविध आयडिया तयार करू शकता. तसेच यू ट्यूब optimization सुद्धा या टूल्स मार्फत करू शकता. हे टूल्स ॲप आणि वेबसाईट या दोन्हींच्या मध्यामतून आपल्याला मिळेल. मूल्य आणि विनामूल्य अश्या दोन्ही प्रकारात या टूल्सला तुम्ही वापरू शकता.
3. Buzzsumo
Buzzsumo हे टूल्स सोशल मीडिया ऑप्टमायझेशन साठी अथवा सोशल मीडिया मार्केटिंग साठी कंटेंट रिसर्च साठी त्याचप्रमाणे influence analysis करू शकता. आणि कोणत्याही कीवर्ड रिसर्च साठी या टूलचा उपयोग करता येणार आहे. जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत. जे सध्या चालू आहे ते याच्यावर शोधू शकता. तर हे टूल सोशल मीडिया ऑप्टमायझेशन करिता आहे. तुम्ही जर शिकत असाल तर या टूल्स चा उपयोग करू शकता.
4. Gramarly
ग्रामरली हे टूल सर्वात जास्त ते लोक वापरतात, जे विविध विषयावर कंटेंट बनवतात, अथवा ब्लॉग लिहितात. असे व्यक्ती या टूल्सचां वापर प्रामुख्याने करतात. तसेच या टूल्सचा वापर त्याच्या नावाप्रमाणे ग्रामर चेक करण्यासाठी केला जातो. त्याचप्रमाणे याचा उपयोग SCO मध्ये सुध्दा केला जातो. जेंव्हा आपण डिस्क्रिपशन लिहितो, टायटल लिहितो तसेच हेडिंग तयार करतो यासाठी याचा वापर होतो. SCO मध्ये जे कन्टेन्ट लिहिले जातात, तर ते नीट करण्यासाठी या टूल्स चा वापर होतो.
5. Answer the public
ही एक वेबसाईट आहे ज्यावर जाऊन तुम्ही विविध कीवर्ड वापरून त्याच्याशी निगडित जे काही लोकांनी प्रश्न विचारलेले आहेत. ते प्रश्न यावर तुम्हाला मिळू शकतात. जर तुम्ही एक ब्लॉगर असाल तर याचा उपयोग तुम्हाला तुमच्या कंटेंट संबंधित अथवा विषयसंधर्भात माहिती मिळू शकते. त्याचप्रमाणे तुम्हाला यावर कळू शकेल, की लोक काय काय प्रश्न विचारतात गूगल वर ज्यावर आधारित तुम्ही कंटेंट लिहू शकता ब्लॉग लिहू शकता. ज्या वेळी आपण प्रश्नावली वर आधारित कन्टेन्ट लिहिण्यासाठी घेतो तेंव्हा नक्की या टूल्स ची मदत तुम्ही घ्यायला हवी.
या वेबसाईट वर तुम्हाला विविध सोशल प्लॅटफॉर्म वरील अकाउंट चे विश्लेषण पाहायला भेटणार आहे. जसे की ट्विटर फेसबुक इंस्टाग्राम यू ट्यूब यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्म चे विश्लेषण पाहायला भेटणार आहे. त्यासाठी केवळ त्या व्यक्तीच्या अकाउंट चे नाव आणि चॅनल चे नाव या वेबसाईट वर टाका. आणि त्याची संपूर्ण विश्लेषणात्मक माहिती मिळवा. तसेच एखाद्या प्लॅटफॉर्म वर कोण कोण कितव्या रँकिंग वर आहे हे सुध्दा पाहायला भेटणार आहे. तसेच तुम्ही तुमच्या अकाउंट अथवा चॅनलच प्रिडिक्षण यावर पाहू शकता.
7. Fiverr
हे टूल ॲप्लिकेशन तसेच वेबसाईट अश्या दोन्ही माध्यमात तुम्हाला मिळू शकते. ज्यावर तुम्ही रजिस्टर करू शकता तसेच यावर तुम्हाला ग्राहक ही मिळू शकतात. जे वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला डिजिटल मार्केटिंग वर आधारित पोजेक्ट मिळवून देऊ शकतात. त्यासाठी केवळ तुम्हाला यावर अकाउंट बनवावे लागेल. आणि ते बनवल्या नंतर तुम्हाला यावर वेगवेगळे ग्राहक मिळतील ज्यांच्याशी तुम्ही सौदे करू शकता. तसेच तुम्ही जर एखादी वेबसाईट तयार केली असेल, अथवा ग्राफिक डिझायनिंग करत असाल. तर त्याच्याशी संबंधित वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझाईनर या टूल्स वर उपलब्ध होऊ शकतात. तसेच तुम्हीं स्वतःला रजिस्टर करून तुमच्या सर्व्हिस या टूल माध्यमातून डिलिव्हर करू. शकता
तर हे होते काही डिजिटल मार्केटिंग संबंधित टूल्स हे तुम्हाला आवडले असतील तर आम्हाला आपला अभिप्राय जरूर कळवा. आणि यासारख्या महत्वाच्या साधनसामग्री साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas joshi

Comments
Post a Comment