Skip to main content

Best three technical application



सुरक्षा, उपयुक्तता, महत्त्व या तिन्ही गोष्टी समाविष्ट असणारे ऍप 

आपण जर स्मार्टफोन युजर असाल तर तुम्हाला या महत्वाच्या ॲप बद्दल माहित असायला हवे. कारण हे केवळ महत्वाचे नाही, तर ते तुम्हाला सुरक्षा सुद्धा प्रदान करतात. ज्याना वापरून तुम्ही तुमच्या मोबाईल ची सुरक्षा आणि सेटिंग अधिक आकर्षक करणार आहात. आपल्याला दैनंदिन आयुष्यात नक्की अश्या छोट्या छोट्या गोष्टींची आवश्यकता भासते. कारण छोट्या गोष्टी कोणत्या ही क्षणाला आपल मोठ काम करून जातात. आणि त्याचा फायदा ही तेंव्हा कळतो. तर मग चला असे कोणते एप्लिकेशन्स आहेत जे आपल्याला महत्वाचे ठरणार आहेत ते बघू.

 

Chack out alarmy -


मला वाटतं हा प्रॉब्लेम बहुतेक काही लोकांना खूप असतो. की जे सकाळी उठण्यासाठी अलार्म लावतात. आणि अलार्म वाजायला लागल्यावर ते उठतात खरे, परंतु अर्धे उठतात. अलार्म बंद करतात आणि पुन्हा झोपेच्या दुनियेत मग्न होतात. आणि मग सकाळी उठल्यावर याची शिक्षा म्हणून आपली जलद गतीने होणारी आवराआवर, त्यातून काही गोष्टी विसरून जाणे, महत्वाच्या गोष्टी न्यायला विसरणे. अश्या गोष्टी सतत या आपल्याला पाहायला मिळतात. आणि मग आपण विचार करतो सकाळी लवकर उठलो असतो तर बर झालं असत. तर अश्याच गोष्टी होऊ नये म्हणून हे ॲप्लिकेशन तुमच्यासाठी आणले आहे. जे तुम्हाला सकाळी एक प्रेरणादायी अलार्म ठरेल. ज्याला बंद न करता तुम्हीं उठून तुमच्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पाडाल. त्यासाठी एप्लिकेशन्स डाऊनलोड करा आणि आपल्या दैनंदिन कामाची सुरुवात करा. आणि तरी ही तुम्हाला जास्त झोप लागत असेल, तर विचार करा भविष्याचा कारण हा विचार खूप लोकांची झोप उडवतो. 🤣 बर चला विनोद बाजूला ठेऊन, आपण आपल्या पहाटेच्या प्रेरणादायी क्षणाकडे वळू, त्यासाठी खालील लिंक वर जाऊन एप्लिकेशन डाउनलोड करा. आणि सेटिंग करा. 

लवकर निजे लवकर उठे त्याला आरोग्य संपत्ती लवकर भेटे.


Chack out access dot


                              आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या तंत्रज्ञान किती मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे. त्यामधे काही गोष्टी या चांगल्या घडत आहेत, तर काही वाईट. चांगल्या गोष्टी नक्कीच मानवाला उपयुक्त ठरत असतात. तर वाईट गोष्टींचा परिणाम मानव भोगत असतो. ते सुद्धा त्याच्या विचारांनी. कारण स्वार्थी, लोभी बनून इतरांच्या भावना तो पायाखाली तुडवत स्वतःला भावनाहिन मानून वाईट काम करत असतो. जसे की आपला डेटा चोरून आपल्या आर्थिक आणि मानसिक परिस्थितीवर हल्ला करणे, आपला संपूर्ण डेटा चोरून पैश्यांची मागणी करणे. अश्या स्थिती मध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात तणावपूर्ण परिस्थिती खाली दाबलो गेलेलो असतो. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. अश्या वेळी हे सर्व रोखण्यासाठी आपल्याला सतर्क राहायला हवं. अस वाटत असत, परंतु ते कस तर ते या एप्लिकेशन्स च्या मदतीने तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. हे ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईल मधील सर्व डेटा बेस वर लक्ष ठेवत असत. त्याचप्रमाणे कुणी जर तुमचा डेटा चोरण्यासाठी तुमचा मोबाईल हॅक करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्याचा शोध घेऊन तुम्हाला सूचना देते. ते कस तर आपल्या फ्रंट कॅमेरा पाशी एक आय व्ही आर सेन्सर बसवलेला असतो तो आपल्याला सूचित करतो की आपला मोबाईल सुरक्षित आहे की असुरक्षित आहे. असुरक्षित असल्यास हे एप्लिकेशन्स त्यामधील लाईट ऑन करते. याचा अर्थ आपला मोबाईल कुणाच्या तरी नियंत्रणात गेला आहे. अश्याप्रकारे आपल्याला या एप्लिकेशन्स ची मदत होणार आहे. तर मग चला सुरक्षा रक्षक तैनात करू आपल्या मोबाईल सुरक्षेसाठी.



Chack out (WTMP)


                         कधी कधी आपण एक अनुभव घेतला असेल, की आपल्या मोबाईलचा गुपचूप कुणीतरी पासवर्ड काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्या प्रयत्नातून आपला मोबाईल जास्त वेळा पासवर्ड टाकल्याने लॉक झालेला दिसतो. अश्या वेळी आपला मोबाईल आपल्या अनुउपस्थितीत कोण हाताळतो?, कोण पासवर्ड काढायचा प्रयत्न करते. तर या गोष्टी समजत नाही. तर ते कस समजेल? तर ते या एप्लिकेशन्स मार्फत समजणार आहे. जे तुम्हाला सांगेल की तुमच्या मोबाईल चा पासवर्ड कोणत्या व्यक्तीने काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यासाठी आपल्याला एप्लिकेशन्स डाउनलोड करून त्याला एसेक्स करण्यासाठी मोबाईल मधील (application allows) संमत्ती द्या. जेणेकरून ते आपल्या मोबाईल मध्ये ॲक्टीव होईल. जे त्या पासवर्ड टाकणाऱ्या व्यक्तीचा फोटो कॅपचर करेल. जेणेकरून तुम्ही जाणून घेऊ शकता कोणी तुमचा मोबाईल एसेक्स करण्याचा प्रयत्न केला. तर मग चला ॲक्टिव् करू आणि सुरक्षित राहू. 



अश्याच मजेशीर टिप्स, ट्रिक आणि वेबसाईट जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!

                                                - Ramdas Joshi 

Comments