Skip to main content

रॅम बद्दल माहिती ( Information about RAM)


 
मित्रांनो आजच्या टायमिंग मध्ये आपल्याला काही माहित असो नाहीतर नसो, परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात आपल्याला माहित असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आत्ताचा जो काळ आहे तो टेक्नॉलॉजी चा काळ आहे.

नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या टेक्नॉलॉजी वेब या वेबसाईट मध्ये.

 आपण आज जाणून घेणार आहोत एका अशा शब्दाबद्दल जो आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरतो. तर तो शब्द आहे रॅम. रॅम म्हणजे काय? या शब्दाशी सर्व स्मार्टफोन वापरणारे लोक परिचित आहेत. कारण आपण जेव्हा नवीन मोबाईल घ्यायला जातो. तेव्हा आपल्या मनात हे नक्की असतं, की आपल्याला किती रॅम वाला मोबाईल घ्यायचा आहे. ज्यामुळे भविष्यात आपल्याला कोणत्याही प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. 


 रॅम संदर्भात सांगायचं झालं तर, कॉम्प्युटर असेल, लॅपटॉप असेल, तसेच तुमचा मोबाईल सर्व डिव्हाईस मध्ये हा एक महत्त्वाचा घटक आहे. कारण याच्यामुळे कोणताही डिव्हाईस चांगल्या रीतीने काम करतो. जर तुम्हाला सुद्धा माहित नसेल, तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. की रॅम म्हणजे काय? आणि तुमच्या मोबाईल मध्ये अथवा कॉम्प्युटर मध्ये किती रॅम असायला हवा. सगळ्यात आधी मी तुम्हाला रॅमचा फुल फॉर्म सांगतो. random access memory याच्या फुल फॉर्म वरून याबद्दल आपल्याला काही खास समजेल असं वाटत नाही. तर चला आपण एका उदाहरणाद्वारे याला समजून घेऊ


   समजा तुम्ही एखाद्या ऑफिसमध्ये बसलेले आहेत. आणि तुम्हाला काम करण्यासाठी एक फाईल हवी आहे. तर तीच फाईल एखाद्या दुसऱ्या रूम मध्ये ठेवली आहे. तर तुम्हाला जेव्हा काम करायचं असेल, तेव्हा तुम्ही त्या रूम मध्ये जाऊन ती फाईल घेऊन याल. आणि डेस्कवर ठेवून काम करायला सुरुवात कराल, परंतु कधीकधी अशी वेळ येते, की तुम्हाला एकाच वेळी खूप काम करायला लागतात. आणि यासाठी खूप सार्‍या फाइल्सची गरज पडते. या जास्त कामासाठी तुम्हाला जास्त फाईल लागल्यावर, एका मोठ्या डेस्कची गरज लागेल. जेव्हा तुम्हाला कोणतही काम करायचं असेल तेव्हा तुम्ही ती फाईल त्या डेस्क वरून घेऊन काम कराल. जेव्हा तुमचं काम संपेल. तेव्हा तुम्ही त्या सर्व फाइल्स त्या रूम मध्ये नेऊन ठेवाल.


तर जी काही रॅम असते. ती अशाच प्रकारे आपल्या मोबाईल मध्ये काम करत असते जी फाईल वाली दुसरी रूम आहे ती म्हणजेच आपली इंटरनल मेमरी आपण समजू. आणि फाइल्स म्हणजे आपल्या मोबाईल मधील ॲप्लिकेशन्स आहेत. आणि जो डेस्क आहे तो तुमच्या मोबाईलचा रॅम असेल ज्यावर तुम्ही काम करता. तर या ठिकाणी याचं काम तुमच्या आदेशानुसार एखाद्या ॲप्सला घेऊन येऊन या ठिकाणी चालू करणे हे असतं. कारण कोणत्याही ॲप्सला ओपन व्हायला काही सेकंदाचा टाईम लागतो. आणि हे यामुळे होत असतं की रॅम ची स्पीड खूप जास्त असते. 


   तर याठिकाणी याच काम तुमच्या सूचनेनुसार कोणत्याही ॲप्लिकेशनला घेऊन येऊन तुमच्यापुढे चालू करणे हे असत. तुम्ही या गोष्टीवरून याचा अंदाज लावू शकता. की एक जीबी रॅम तयार करण्यासाठी इतका खर्च येतो, की सोळा जीबी मेमोरी कार्ड बनवण्या इतका असतो. तर सी.पी.यू. ला जी फाईल लागत असते. रॅम तिला लवकरात लवकर पाठवण्याच काम करत असतो. 


जेंव्हा तुम्ही एखाद्या गेम्सला इंस्टॉल करता. तर तेंव्हा ती गेम रॅम मध्ये नाहीतर ती तुमच्या फोनच्या इंटरनल मेमरी मध्ये इन्स्टॉल होते. आणि जेव्हा तुम्ही त्या गेम्स वर क्लिक करता. तेव्हा ती गेम चालू करण्यासाठी फोनच्या मेमरी मधून रॅमवर येते. आणि रॅम काम करू लागतो.


 हे करत असताना सीपीयू आणि रॅम यांच्यामध्ये वेगाने माहितीची देवाणघेवाण होत असते. परंतु जर तुमच्या मोबाईल आणि कॉम्प्युटरची रॅम कमी असेल, आणि तुम्ही एखादं खूप मोठ एप्लीकेशन चालू करता. तेव्हा त्या परिस्थितीमध्ये तुमचा मोबाईल किंवा कॉम्प्युटर हँग होऊ लागतो. म्हणून सर्वजण म्हणतात की जास्त रॅम आपल्या मोबाईल साठी उपयुक्त असतो.आणि आत्ता तर सुपर मल्टीटास्किंग आहे. ज्यामध्ये आपल्याला एकाच वेळी व्हाट्सअप चालवायच असतं, गाणे ऐकायचे असतात, फेसबुक चालवायच असतं, ट्विटर चालवायचं असतं. म्हणजेच कोणतीच मर्यादा नाही. ही झाली मल्टी टास्किंगची गोष्ट. आत्ता पुढे जाणून घेऊ रॅम असणं किती महत्त्वाचा आहे. सांगण्याचा अर्थ असा आहे, की रॅम काय आहे हे तर आपण जाणून घेतलं, परंतु आत्ता हे सुद्धा जाणून घ्यायचं असेल की किती रॅम असणे महत्वाचं आहे. 


 तर आजच्या काळामध्ये कोणत्याही मोबाईल मध्ये कमीत कमीत 2GB Ram तर असायलाच हवं. कारण आजकालच्या एप्लिकेशन्सची साइज हळू हळू वाढत आहे. जस की फेसबुक बद्दल सांगायचं झालं तर.. हे ॲप्स जेव्हा ओपन होतं. तेव्हा 200 ते 300 एमबी राम खर्च होऊन जाते. आणि फक्त फेसबुक नाही तर बाकीचे सर्व एप्लिकेशन्सची साइज् अपग्रेड होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की मोबाईल मध्ये तुम्ही खूप सारे ॲप्स एकच वेळी चालवता यायला हवे. तर मग तुमच्या मोबाईल मध्ये रॅम ही तितका पूरक असणे गरजेचं आहे. 

तर नक्कीच तुम्ही रॅम काय आहे? किती असावा लागतो? आणि त्याचा काय उपयोग होतो? हे जाणून घेतलं असेल तर अश्याच अपडेटसाठी आमच्याशी जोडून रहा. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल आम्हाला नक्की आपला अभिप्राय कळवा. 


अश्याच वैविध्यपूर्ण ज्ञानावर आधारित माहिती आणि तंत्रज्ञानावर आधारित टिप्स आणि ट्रिक्स जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या संकेतस्थळावर भेट द्या धन्यवाद!

                                                                                                               - Ramdas Joshi 

 


Comments