या प्रकारे सेटिंग करा आणि आनंद घ्या आपल्या मोबाईल मधील आकर्षक फीचर्सचा
आपण रोज वापरत असलेले स्मार्टफोन आणि आपली ओळख ही खूप दिवसांपासूनची असते. परंतु त्याच स्मार्टफोन बद्गल आपल्याला इतके ज्ञान अवगत नसते. त्यामधे अनेक असे फीचर्स आहेत, की जे आपल्याला अत्यंत उपयोगी आणि आपला स्मार्टफोन अधिक आकर्षक वाटावा अश्या वेगवेगळ्या सेटिंग व्यवस्थापनाची सेवा देत असते. आणि काही आपल्या मोबाईल मधील गुपित सेटिंग असतात, ज्या आपल्याला माहीत नसतात. तर त्यांचा उपयोग करून आपल्याला एक वेगळाच अनुभव आणि आनंद ही घेता येईल. तर मग चला या काही मजेशीर मोबाईल संधर्भात असलेल्या गुपित गोष्टी जाणून घेऊयात. ज्या आपल्यासाठी खास ठरणार आहेत.
Smart call -
मित्रानो ही जी काही सेटिंग आहे तर ही अत्यंत मजेशीर आणि उपयुक्त अशी सेटिंग आहे. ही आपल्याला आपल्या मोबाईल वर आलेले कॉल उचलण्यासाठी ऑटोमॅटिक सेवा प्रदान करते. जेंव्हा आपल्या मोबाईल वर फोन येतो तेंव्हा आपल्या मोबाईल मध्ये फोन उचलण्यासाठी नेव्हिगेशन दिसत असतात. ज्यावर टॅब करून आपण फोनवर बोलतो तर स्मार्ट कॉल ही जी काही सेटिंग आहे ती तुम्हाला फोन न उचलता फोन कानाजवळ घेऊन जायला सांगते, आणि डिटेक्ट करून आपला आलेला कॉल आपोआप उचलला जातो. आपल्याला यासाठी फोन उचलण्याची आवश्यकता नाही. केवळ सेटिंग चालू करा आणि आपल्या मोबाईल वर आलेल्या कॉलला न उचलता बोलण्यासाठी कानाजवळ न्या. तुमचा कॉल आपोआप उचलला जाईल तर ही सेटिंग कशी करायची ती पुढील प्रमाणे करा.
Go in your mobile setting
Shortcut and accessibility
Smart call settings on
अश्या रीतीने तुम्ही तुमच्या मोबाईल ची सेटिंग स्मार्ट करून अधिक आकर्षक बनवू शकता. ही सेटिंग तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या डिव्हाईस मध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला भेटेल त्यामुळे तुमच्या डिव्हाईस मधील सेटिंग मध्ये प्रवेश करा त्याठिकाणी accessbilty हा पर्याय असेल त्यामधे शोधू शकता.
Smart wake -
हा पर्याय अतिशय गमतीशीर आहे हा पर्याय चालू केल्यावर तुम्ही तुमच्या मोबाईल मधील असणारे एप्लिकेशन्स आणि त्यांची नावे ज्या अक्षराने सुरू होतात. त्या अक्षराला केवळ स्क्रीन वर बोटाने write करायचे आहे. उदा. व्हॉट्सॲप असेल तर w हे अक्षर आपल्या लॉक असलेल्या स्क्रीन वर रेखाटायचे आहे. हे अक्षर तुम्ही write केल्यावर तुम्हाला ही सेटिंग थेट तुमच्या व्हॉट्सॲप मध्ये घेऊन जाईल. तसेच इतर एप्लिकेशन्स बाबतीत आहे. त्यासाठी केवळ सुरू होणारे अक्षर आपल्याला आपल्या स्क्रीन वर काढायचे आहे. हे केवळ तुम्ही तुमची स्क्रीन लॉक असताना वापरू शकता. त्याची सेटिंग अगदी तशीच आहे ती पुढीलप्रमाणे -
Settings - accessbilty - turn on smart wake
Data traffic management -
आपण सर्वजण इंटरनेट चां अनुभव घेत आहोत. तसेच त्यासाठी रिचार्ज करत असतो. ज्यामधून आपल्याला आकर्षक ऑफर्स सुद्धा भेटत असतात. परंतु कधी कधी काय होते की आपला डेटा जो आहे तर तो आपोआप संपू लागतो. तर हे कश्यामुळे होते आपल्याकडे अनेक असे ॲप्स असतात. जे ऑनलाईन पद्धतीने चालतात. तर हे सगळे ॲप आपोआप ॲक्सेस होत असतात, ज्यामुळे आपला डेटा कमी होत जातो. तर ही गोष्ट होऊ नये त्यासाठी ही सेटिंग मोबाईल मध्ये उपलब्ध आहे. या सेटिंगच्या मदतीने आपण ठरवू शकता की कोणत्या ॲप्स ला डेटा वापरण्याची अनुमती द्यायची आणि कोणत्या ऍप ला डिॲक्टिवेट करायचं तर ते ॲप निवडून तुम्ही सेटिंग चालू करू शकता. ज्यामुळे आपला डेटा बचत होईल ही सेटिंग पुढीलप्रमाणे करा.
Settings - data traffic management - network management - select app
तर या आहेत आपल्या मोबाईल मधील काही आवश्यक गुपित सेटिंग ज्या आपल्याला अवगत झाल्या.
अश्याच मजेशीर ट्रिक्स टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद.

Comments
Post a Comment