Skip to main content

Define technical application




काही महत्त्वाचे एप्लिकेशन्स

आपल्याला माहीतच असेल, की जेंव्हापासून तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे, "तसतसे मानवाने अनेक गोष्टींचा शोध लावून त्याने त्याचे श्रम कमी केले. वेगवेगळ्या मशिन्स बनवल्या, तसेच विविध प्रकारच्या कंपन्या ज्यामधे लाखो प्रकारचे प्रोडक्शन काढले, त्यामधे मोठमोठ्या गाड्यांचे पार्ट आणि विविध प्रकारच्या वस्तू बनवल्या. तसेच तंत्रज्ञानाची गरज लक्षात घेता आपण वापरतो ते मोबाईल सुद्धा त्याने विकसित केले, आणि आपल्या सेवेत हजर केले. यामुळे त्याच्या जीवनाला गती मिळाली. तर अश्याच रीतीने आज मी असेच काही ॲप्स घेऊन आलो आहे. ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या ज्ञानाला आणि मोबाईल ला गती देणार आहात. तसेच तुम्हाला त्याचा फायदा ही मोठ्या प्रमाणात होणार आहे. तर मग जाणून घेऊ ते कोणते ॲप्स आहेत - 

                         

E2PDF restore sms call -

                                  हे ॲप्लिकेशन तुम्हाला अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलची कॉल हिस्टरी पाहायला भेटणार आहे. ती पणं जेंव्हा पासून तुम्ही तुमचं सिम कार्ड वापरत आहात तेंव्हापासून ची कॉल हिस्टरी पाहू शकता. तसेच तुम्ही केलेल्या मेसेज ची मागील हिस्टरी जाणून घेऊ शकता. त्यासाठी केवळ तुम्हाला ऍप डाऊनलोड करायचे आहे, आणि लॉग इन करून त्यामधे नंबर टाकायचा आहे. ज्या मोबाईल नंबर ची हिस्टरी काढायची आहे तो नंबर टाका. आणि कॉल हिस्टरी काढा नक्की तुम्हाला हे ॲप उपयुक्त ठरेल.

Click hear and download apk

Voice access -

                  आपल्या मोबाईल मध्ये अनेक एप्लिकेशन्स असतात. परंतु ते कसे वापरायचे ते आपल्याला मुख्यतः माहीत नसते. आणि यामुळे आपल्याला नक्की तोटा होत असतो. परंतु जर तुम्हाला प्रॉपर माहिती असेल, तर त्याचा पूर्ण ॲक्सेस तुमच्या मनाप्रमाणे करू शकतात. तसेच आपल्या प्ले स्टोअर मध्ये अनेक महत्वाचे ॲप्स उपलब्ध आहेत, ज्याबद्दल आपल्याला माहीत नाही. तर त्यामधील च हे एक voice access ॲप आहे ते तुमच्या मोबाईल मध्ये स्थापित करून त्याचा उपयोग मोबाईल ला कमांड देण्यासाठी करू शकता. त्यासाठी हे ॲप डाऊनलोड करा, आणि तुमच्या मोबाईल मध्ये स्थापित करून, accessbilty मध्ये जाऊन सहमती द्या. जेणेकरून ते तुमच्या मोबाईल मध्ये चालवता येईल. ते कसे तर तुम्ही फक्त बोलायचे आहे आणि हे ॲप त्या ठिकाणी घेऊन जाईल उदा. Open chrome, open WhatsApp, open album etc. जेवढे ॲप्लिकेशन आहेत. तेवढ्या एप्लिकेशन्स मध्ये तुम्ही जाऊ शकता. केवळ मोबाईल ला आज्ञा द्या रिझल्ट तुमच्या समोर असेल. 

Click hear and download

Socretice by Google - 

                           तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला या ॲप्स चा मोठा फायदा होणार आहे. तो कसा? तर तुम्ही या एप्लिकेशन्स मार्फत तुमच्या प्रश्नांची उत्तरे शोधू शकता उदा. गणित (maths) तर अश्या विषयांच्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला एका क्लिक मध्ये पायऱ्यानुसार मिळणार आहे. जे अत्यंत मजेशीर आणि महत्वाचं ठरणार आहे. त्यासाठी केवळ तुम्हाला हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल, आणि स्कॅन करून सबमिट करा आणि उत्तरे मिळवा.

Click here and get this apk

Google Opinion Rewards -

                                  हे ॲप तुम्हाला पैसे कमविण्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. ज्यामध्ये विविध सर्वे आहेत जे तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आणि त्यामधून तुम्हाला रीवार्ड भेटतील. जे परचेस करून तुम्ही कमवू शकता, तसेच हे ॲप्स गूगल च आहे तर त्याच्यावर विश्वास करायला काही हरकत नाही. त्यामुळे तुम्ही हे ॲप्स प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करू शकता. 

Click here and download application

हे होते काही महत्त्वाचे ॲप्स, जे तुम्हाला कदाचित माहित नसतील. तसेच जे अत्यंत उपयोगी आणि उपयुक्त ठरणार आहेत. तुम्ही हे ॲप प्ले स्टोअर मधून डाउनलोड करू शकता. यामध्ये कोणत्याही प्रकारची असुरक्षितता नाही. कारण epdf call history ॲप सोडून बाकीचे गुगल चे ॲप्स आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त यांचा उपयोग तुमच्या फायद्या साठी करू शकता. तसेच एप्लिकेशन्स संधर्भात तुम्हाला कोणते ही प्रश्न शंका असतील, तर ते आमच्या संकेतस्थळाला भेट देऊन, आमच्या ईमेल वर कळवू शकता. तत्पूर्वी असेच मजेशीर ॲप्स आणि टेक्नॉलॉजी संधर्भात अपडेट घ्यायच्या असतील, तर आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!

                                                                                                                   - Ramdas Joshi 


Comments