ऑनलाईन रेडिओ ऐका -
आपल्याला आठवत असेल की आपला जन्म झाला तेंव्हा डिजिटल सेवा या तेवढ्या प्रगत नव्हत्या, आणि आत्ता सारख्या तेवढ्या वेगवान ही नव्हत्या. आधी संदेशवहन करण्यासाठी पत्रे पाठवली जात असत, परंतु जसं जसा काळ उलटत गेला तसतसा डिजिटल सेवा या विकसित होत गेल्या. आणि आत्ता तर त्या इतक्या प्रचंड प्रमाणात विकसित झाल्या आहेत, की ज्यांचा उपयोग करून मनुष्य यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. आणि हो तो तिथे जाऊन थांबलाय अस आजिबात नाही हं! , तर त्याची वेगवेगळ्या गोष्टींवर असणारी शोध प्रक्रिया जी आहे ती चालूच आहे. त्याने आत्तापर्यंत अनेक शोध लावले जे आश्चर्यकारक आहेत. न्यूटन, एडिसन, स्टीफन हॉकिंग पासून तर आत्ताच्या आधुनिक वैज्ञानिकांच्या काळापर्यंत त्याने खूप मोठ्या प्रमाणात शोध लावले. जे आत्ता आपण उपभोगत आहोत. टीवी, कॉम्प्युटर, स्मार्टफोन, घरातील उपकरणे हे सर्व त्याच्याच आविष्काराचे प्रकार आहेत. तसेच काही काळ मागे गेलो तर काही अशी उपकरणे आहेत ज्यांचा अनुभव आपण घेतला आहे.जसे की रेडिओ, ब्लॅक अँड व्हाइट टीवी, टेलिफोन अश्या डिजिटल सेवांचा उपयोग आपण केलेला आहे. परंतु या सेवा तितक्या विकसित नव्हत्या ज्या आत्ता आहेत, जसे की तेंव्हाचा टीवी हा पूर्णतः रंगहीन होता. नंतर त्याच्यात बदल करून रंगीत टीवी मध्ये परावर्तित केले. त्यावेळी एक समस्या येत असे ती म्हणजे चॅनल्स क्लिअर दिसत नसत. असच रेडिओ या उपकरणा बाबत ही होत असे. ते कसे? तर ज्या काही प्रकाशित होणाऱ्या वाहिन्या, आणि केंद्रे होती. तर त्यांच्या प्रसरण लहरी या रेडिओ मध्ये योग्य रीतीने प्रस्थापित होत नसत. यामुळे व्हायचं अस की आपण जे कार्यक्रम लावत असत. ते स्पष्टपणे ऐकायला भेटत नसत. मध्येच खराब पद्धतीने ते चॅनल्स चालताना अनुभव यायचा. मग कालांतराने याच उपकरणात मोठ्या प्रमाणात बदल घडवून आले. ज्यामुळे आधी ज्या समस्या येत असत त्या आत्ता येत नाहीत. तर मग चला आजच्या काळातील प्रगतशील उपकरणाचा उपयोग करत असताना आपण तो ही अनुभव घेऊ. परंतु आत्ताचे चॅनल्स क्लिअर आहेत त्यामुळे कोणत्याही प्रकारे तुम्हाला नेटवर्क पकडण्यासाठी अँटेना सेट करायची गरज नाही. केवळ आहेत त्या जागी बसा, आणि या मजेशीर वेबसाईटचा आनंद घ्या. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
स्टेप्स
१) खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
२) पुढील पेजवर जा आणि वेगवेगळ्या चॅनल्स चां उपभोग घ्या, तो ही कोणतीही समस्या न येता.
अश्याच मजेशीर वेबसाईट, ट्रिक्स आणि टीप्स साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

Comments
Post a Comment