मित्रानो इंटरनेट-च्या या अभूतपूर्व जगामध्ये जगत असताना, आपण रोज नवनवीन कार्यकृती या विकसित तंत्रज्ञानावर दर्शवत असतो. जसे की शेअरिंग करणे, चॅटिंग करणे, तसेच नेट बँकिंग आणि विविध ऑनलाइन सोशल प्लॅटफॉर्म यांच्यावर आधारित आपल जीवन गुंतून टाकत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का? ही इंटरनेट ची दुनिया जरी आकर्षित वाटत असली. तरी ती आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला तोट्यात सुद्धा आणू शकते. कारण आत्ताची तरुण पिढी ही अत्यंत मोठ्या प्रमाणात या इंटरनेटच्या आभासी दुनियेमध्ये स्वतःला हरवून बसली आहे. इंटरनेट ची दुनिया ही आपल्याला कितीही आकर्षक वाटत असली, तरी ती आपल्यासाठी एक आभासी (व्हर्चुअल) प्रतिमा आहे. की ज्यामधे आपण तास तास रमून जातो. यामुळे अनेक तांत्रिक गोष्टींच्या सहाय्याने सायबर गुन्हे ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येतात. ज्यामुळे आपल्याला खूप मोठा आर्थिक आणि मानसिक फटका सहन करावा लागतो. आर्थिक कसा?, तर जसजसं तंत्रज्ञान विकसित होत गेलं. तसतसे आर्थिक व्यवहार सुद्धा डिजीटल स्वरूपाने पुढे येऊ लागले. आणि या ऑनलाइन सेवांमध्ये आत्ता इतकी गती आली आहे, की सर्वजण ऑनलाइन व्यवहार करण्याकडे लोकप्रियता दर्शवित आहे.
परंतु यामुळे ब्लॅक हॅट वाले (हॅकर्स) त्यांच्या अयोग्य तांत्रिक पद्धतीचा वापर करून, आपल्याला मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवताना दिसून येतात. जसे की पुण्यामध्ये १३ ऑगस्ट २०१८ रोजी झालेला कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला. ज्यामधे ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटल्याचे उघडकीस आले होते. तर हा सायबर हल्ला कसा झाला. आपण ज्या काही ऑनलाईन सेवा वापरतो डेबिट कार्ड, व्हिसा कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग सेवा, फोन पे, पे टी एम, स्विफ्ट व्यवहार यांसारख्या सेवांमुळे हा हल्ला झाल्याचे उघडकीस आले होते. बनावट डेबिट कार्ड, स्विफ्ट व्यवहार यांसारख्या ऑनलाईन सेवांचा समावेश या हल्ल्यामध्ये झाला होता. जे वापरून त्यांनी हा मोठा सायबर हल्ला घडवून आणला होता. तर यांसारख्या ऑनलाइन सेवा ज्या मनाला भुरळ पाडतात, ज्या वेळ वाचवणाऱ्या तर आहेत. परंतु सुरक्षित राहण्यासाठी शंका निर्माण करतात. कारण एका चुकीच्या कृती मुळे त्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे या सेवांचा उपयोग हा काळजीपूर्वक करावा. जेणेकरून अश्या कोणत्याही ॲक्टिविटी होणार नाही ज्या आपल्याला तणावाच्या भोवऱ्यात टाकतील, तसेच आत्ता सध्या याच इंटरनेट वर अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत. ज्या आपल्यासाठी उपयुक्त आहेत. तसेच काही अश्या वेबसाईट असतात ज्यामधे व्हायरस मॉलवेअर इंजेक्ट केलेले असतात ज्यामधून आपला वैयक्तिक डाटा सहज चोरला जातो. तो कसा? तर ते समजून घेऊ.
व्हायरस -
ज्याप्रमाणे शरीरात विषाणू चा शिरकाव झाल्यावर त्याचा परिणाम आपल्या शरीरात जाणवायला लागतो. त्याप्रमाणेच या व्हायरसच आहे आपण ज्या वेबसाईट उघडतो त्याच प्रमाणे जे एप्लिकेशन्स वापरतो त्या एप्लिकेशन्स मार्फत हे व्हायरस आपल्या मोबाईल मध्ये शिरकाव करतात. आत्ता तुम्ही विचार करत असाल की तुम्ही वापरतात ते एप्लिकेशन्स असुरक्षित आहेत का? तर नाही सर्व एप्लिकेशन्स व्हायरसयुक्त असतात अस नाही. जे एप्लिकेशन्स आपल्याकडे वैयक्तिक माहितीची मागणी करतात जसे की ईमेल पासवर्ड त्याचप्रमाणे आपला मोबाईल नंबर आपला पत्ता यांसारख्या गोष्टी एखादे एप्लिकेशन्स आपल्याकडे मागणी करत असेल तर आपण सावध रहायला हवं. कारण एप्लिकेशन्स हे दोन प्रकारे असतात एक म्हणजे आपल्याला त्या ॲप्स वर आपली वैयक्तिक माहिती वापरून नोंदणी करायला लावतात. आणि दुसरे म्हणजे आपला ईमेल पासवर्ड मागतात. तसेच आपल्या विविध अकाउंट ची पूर्ण माहिती मागू शकतात. अश्या गोष्टींच्या आधारावर आपला डेटा चोरीला जाऊ शकतो. कारण ईमेल असा घटक आहे की, जो आपल्या मोबाईल मधील सर्व माहितीवर निरीक्षण ठेवत असतो. संकलित करत असतो सेव्ह करत असतो. तर त्यामुळे आपल्या ईमेल ची तसेच सोशल प्लॅटफॉर्म वरील वेगवेगळ्या अकाउंट ची जसे की फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम ची खरी माहिती देऊ नका. कारण यामुळे आपल्याला हॅक करून आपल्याकडून पैश्यांची मागणी केली जाऊ शकते. तुम्हाला ट्रॅक करून मानसिक तणावाखाली आणू शकतात हे तुमच्यासाठी नुकसानकारक आहे. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या मोबाईल मधील ईमेल चा पासवर्ड कोणत्याही एप्लिकेशन्स मध्ये टाकू नका. नोंदणी करून मग त्या एप्लिकेशन्स ला वापरा जेणेकरून तुमचा ईमेल चां पासवर्ड सुरक्षित राहील. एप्लिकेशन्स मध्ये नोंदणी करताना आपल्याला पुढील स्वरूपात रजिस्टर करायला लावतात
चुकीची प्रक्रिया -
इमेल
ईमेल पासवर्ड
Google1234@gmail.com
Password - 123456
योग्य प्रक्रिया -
नोंदणी करा
. आपले नाव > ईमेल > ओ. टी. पी > लॉग इन
Google > google1234@gmail.com > OTP > log in
तर अश्या दोन प्रकारे तुमच्याकडे मागणी केली जाऊ शकते. तर यापासून सावध राहा तसेच अजुन एक प्रकार आहे जो आपल्याला न कळता आपल्या मोबाईल मधील माहिती घेऊ शकतात.
वेबसाईट मालवेअर -
हे एक अस सॉफ्टवेअर आहे जे आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला न कळता इंस्टॉल केले जाते. कारण आपण खूप वेळा वेबसाईट मार्फत मूवी किंवा व्हिडिओ डाउनलोड करत असतो. तर त्याठिकाणी असणाऱ्या जाहिराती ज्या आहेत त्या मालवेअर इंजेक्ट केलेल्या असू शकतात. ज्या समजत नाही. चुकून त्याच्यावर क्लिक झाल्यावर त्या आपोआप डाऊनलोड होतात. आणि मग आपल्या मोबाईल मधील डेटा हा चोरला जातो. मालवेअर हे विविध ॲड मार्फत आपल्या मोबाईल मध्ये प्रवेश करू शकतात त्यासाठी आपल्याकडे या अश्या गोष्टींना काढून टाकण्यासाठी अँटी सॉफ्टवेअर हे इंस्टॉल असायला हवेत. जेणेकरून आपल्या मोबाईल मध्ये या मालवेअर चां शिरकाव झाल्यावर ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करून रिमुव्ह करून टाकते. आणि आपला मोबाईल किंवा कॉम्पुटर सुरक्षित राहतो. म्हणून वेबसाईट वर भेट देताना वेबसाईट सुरक्षित आहे का? किंवा एप्लिकेशन्स सुरक्षित आहेत का? याची खात्री करा. आणि मग त्याच्यावर तुमची शोध मोहीम चालू ठेवा. तसेच या वेबसाईट ओळखायच्या कश्या? तर त्या खालील स्वरूपात असतात
योग्य वेबसाईट -
HTTPS.thetechnical01.COM
अयोग्य वेबसाईट -
HTTP. thetechnical01.COM
तर अश्याप्रकारे आपण वेबसाईट ची पडताळणी करू शकतो ज्या वेबसाईट HTTPS ने सुरू होतात त्या सुरक्षित आहेत. परंतु ज्या वेबसाईट HTTP ने सुरू होतात या असुरक्षित असतात. तर अश्या गोष्टींपासून दूर राहून आपण आपली होणारी ऑनलाइन फसवणूक रोखू शकतो. त्यासाठी काही सूचना आहेत त्यांचे अनुसरण करा.
सूचना -
१) अनोळखी वेबसाईट वर भेट देऊ नका.
२) आपल्या मनाला भुरळ घालणाऱ्या जाहिरात
जसे की रमी मधून आपल्याला 1500 देण्यात
आले आहेत. ते मिळवा एका क्लिक वर तर
अश्या स्वरूपात येणाऱ्या विविध जाहिराती पासून सावध रहा.
३) आपली वयक्तिक माहिती कोणत्याही
एप्लिकेशन्स किंवा वेबसाईट सादर करू नका
अशाप्रकारे आपण या इंटरनेट वर सुरक्षित राहून स्वतःची काळजी घेऊ शकतो
- Ramdas joshi

Comments
Post a Comment