Skip to main content

cyber update




सायबर सुरक्षा अपडेट -

नमस्कार मित्रांनो आत्ताच्या तांत्रिक युगात जग हे अतिशय मोठ्या प्रमाणात वेगवान झालेलं आहे. तसेच जगामध्ये घडणाऱ्या घटना आणि त्यांचा रिपोर्ट आपल्याला काही क्षणात मिळतो. मग तो कोणत्याही जगाच्या कोपऱ्यातील असो परंतु तो अतिशय झटक्यात आपल्याला समजतो. तो कसा तर आत्ताची सोशल माध्यमे बातम्या, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम अश्या विविध सोशल प्लॅटफॉर्म व्दारे आपल्याला या न्यूज समजत असतात. त्या आपण आपल्या दैनंदिन जीवनात घडताना सुद्धा अनुभवत असतो. 

तर याच बातम्या कोणत्या प्रकारात असतात तर राजकीय घडामोडी, कृषी विषयक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, तसेच क्रीडा विषयक या प्रकारामध्ये आपल्याला बातम्यांचा आढावा हा मिळत असतो. परंतु तुम्हाला माहीत आहे का ? याव्यतिरिक्त जगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे हे घडत आहेत. त्याचप्रमाणे आत्ता तर हे मोठ्या संख्येने सहज रित्या दर मिनिटाला हजारो गुन्हे घडत आहेत. जे आपल्याला समजणे अत्यंत गरजेचं आहे. ते कसे घडतात ? त्यांचा criteria काय असतो? तसेच ते कोणत्या पद्धतीचा अवलंब करतात? कश्या पद्धतीने आपण यांच्यापासून सुरक्षित राहू शकतो? यावर आधारित न्यूज रिपोर्ट हा सहसा आपल्याला कुठे पाहायला भेटत नाही. 
                                      आणि यामुळे आपल्याला सुद्धा कधीतरी या सायबर गुन्ह्यांच्या विविध अयोग्य तांत्रिक पद्धती पुढे शिकार व्हावं लागत. आणि आत्ता तर प्रत्येक व्यक्ती हा या तंत्रज्ञानाचा उपभोग घेत आहे. यामुळे ब्लॅक हॅट वाल्यांच्या अयोग्य तांत्रिक पद्धती पुढे अनेक जण शिकार होताना आपल्याला दिसून येत असतात. कारण प्रत्येक व्यक्ती मोबाईल वापरत आहे कॉम्प्युटर, लॅपटॉप अश्या विविध उपकरणाचा उपयोग दैनंदिन जीवनात करत आहे. तर याच उपकरणांव्दारे आपण या सायबर क्राईम चे शिकार होण्याची शक्यता असते. तर मग आपल्यापुढे सुरक्षिततेचा विषय उभा राहतो. परंतु घाबरु नका आज पासून तुम्हाला या न्यूज रोज उपलब्ध होणार आहेत ज्या वाचून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता. कारण आज मी आपल्यासाठी यावरच आधारित वेबसाईट घेऊन आलेलो आहे. जी तुम्हाला या गोष्टींपासून सुरक्षित ठेवेल. तसेच ही वेबसाईट सुरक्षा तज्ञांकडून बनवली गेलेली आहे. आणि हजारो सुरक्षा व्यावसायिकांचा समावेश या वेबसाईट मध्ये आहे जे तुम्हाला सांगू शकतात. की हॅकर्स कश्या पद्धतीने सायबर जगाला आकार देत आहेत. याचं संपूर्ण कव्हरेज या वेबसाईट मध्ये स्थित आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण आपल्या वेबसाईट कडे वळू, त्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा. 

Follow by following steps.
          
१) खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा. 
२) पुढील पेजवर आल्यावर त्याठिकाणी न्यूज पेज दिसेल. 
टीप - बातम्या इंग्रजी भाषेमध्ये आहेत परंतु भाषांतर करण्यासाठी आपल्या मोबाईल मधील भाषांतर हा पर्याय वापरा त्यामध्ये अनेक भाषा समाविष्ट आहेत तर त्याचे अनुसरण करा. 
अश्याच मजेशीर वेबसाईट ट्रिक्स आणि टिप्स जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद.


Comments