त्यामध्ये आपली कागदपत्रे असतात. त्याचप्रमाणे आपले डिजिटल आर्थिक व्यवहारासाठी वापरले जाणारे ॲप्स असतात. ज्यामधे आपल्या कष्टाची जमापुंजी असते. तर अश्या अत्यावश्यक गोष्टी या आपल्या इवलुशा स्मार्टफोन मध्ये दडलेल्या असतात. तर हाच स्मार्टफोन एखाद्या व्यक्तीच्या हातात पडला तर मग काय होऊ शकते. हे आपण सर्व जाणून आहात की कदाचित ज्याला आपला मोबाईल सापडला आहे तो प्रामाणिक असेल तर तो तुम्हाला शोधण्याचा प्रयत्न करेल संपर्क करेल, परंतु ही गोष्ट 98% होऊ शकते हं! कारण मनुष्य हा खूप विचित्र प्राणी आहे.
ज्यामध्ये स्वार्थ, लोभ, लालसा नावाचे व्हायरस असतात. ते व्हायरस त्याच्या प्रामाणिक पणाला चांगल्या वृत्तीला मारून टाकतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की 98 % शक्यता आहे, की त्याच्यामधील मानवता जागी झाली तर नक्की तुमचा स्मार्टफोन तुमच्याकडे येईल. परंतु तुम्ही या व्हायरस रुपी माणसावर विश्वास ठेऊन तुमचा मोबाईल शोधण्याचा प्रयत्न सोडू नका, नाहीतर मोबाईल ला विसरणे हाच एक पर्याय असेल. तर अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपण काय करायचे त्यावेळी तुम्ही तुमचा मोबाईल कोणत्या पद्धतीने सापडू शकता. तर त्यासाठी तुम्हाला काही पर्याय आहेत जे मोबाईल हरवला तर सापडायला मदत करू शकतात. तर ते बघू कोणते आहेत.
Find my device -
तर याठिकाणी आपण काही पर्याय वापरून आपला स्मार्टफोन मिळवू शकतो अथवा स्थान मिळवू शकतो, की कोणत्या ठिकाणी आपला मोबाईल पडला आहे, अथवा कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर हा पर्याय आपण बघणार आहोत
१) तुम्हाला त्याच वेळी दुसरा डिव्हाईस उपलब्ध करावा लागेल.
२) त्यामधे असणार क्रोम ओपन करा. त्यामधे google ओपन करा आणि गूगल वर फाईंड माय डिव्हाईस( find my device) अशी वेबसाईट टाका
३) त्यानंतर पुढे आपला ईमेल आणि पासवर्ड त्यामधे प्रविष्ट करा.
४) पुढे ते टाकल्यानंतर लॉग इन करा.
५) लॉग इन केल्यावर तुमच्यापुढे एक नकाशा ओपन होईल ज्यामध्ये आपण पाहू शकतो की कोणत्या ठिकाणावर आपला मोबाईल पडलेला.
६) मोबाईल जर जवळ पडला असेल सापडत नसेल जसे की गवतात पडला असेल तेंव्हा सापडत नसेल तर तुम्ही जो नकाशा ओपन केला आहे त्याच्या खाली तीन पर्याय दिसतील.
Play the sound - Secure device - Erase device
असे पर्याय दिसतील तर ते वापरू शकता. तर हे पर्याय समजून घेऊ.
Play the sound -
हा पर्याय तेंव्हा वापरा जेंव्हा आपला डिव्हाईस आपल्या आसपास दर्शवत असेल, आणि सापडत नसेल. जसे की कुठे पडला असेल तर या पर्यायाचा उपयोग करू शकता. कारण हा पर्याय क्लिक केल्यावर तुमचा मोबाईल आवाज करू लागेल.
Secure device -
हा पर्याय तुम्ही तेंव्हा वापरू शकता. जेंव्हा तुमचा डिव्हाईस एखाद्या व्यक्तीला सापडला आहे. तेंव्हा तुम्ही या पर्यायावर क्लिक करून, त्याठिकाणी तुम्ही तुमचा पत्ता तुमचा दुसरा मोबाईल नंबर देऊन तो फोन लॉक करू शकता. जेणेकरून तुमचा डिव्हाईस वर तो मेसेज दिसेल आणि जो वाचून प्रामाणिक असलेला व्यक्ती तुम्हाला संपर्क करेल. तसेच 98% विसरू नका हं.
Erase device -
हा पर्याय तुम्ही तेंव्हा वापरू शकता. जेंव्हा तुमचा डिव्हाईस तुम्हाला सापडत नसेल. आणि ती न सापडण्याची शक्यता जास्त असेल. तेंव्हा या पर्यायाला क्लिक करू शकता. जेणेकरून तुमच्या डिव्हाईस मधील सर्व डेटा डिलीट होऊन जाईल, परंतु एक लक्षात ठेवा मोबाईल सापडण्याची दाट शक्यता नसेल तर हा पर्याय वापरा.
तर हे आहेत पर्याय जे वापरून तुम्ही तुमच्या स्मार्टफोन ला सापडू शकता.
परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असलेल्या ईमेल अकाउंट चा ईमेल आणि पासवर्ड हा तुमच्या लक्षात असायला हवा. कारण बऱ्याच वेळा असा अनुभव आला आहे की इंटरनेट वर आपले अनेक अकाउंट आहेत ज्यांचा पासवर्ड आपल्या लक्षात नसतो. ज्यामुळे ते अकाउंट रिकव्हर करायला समस्या उद्भवतात. तर असे पासवर्ड लक्षात ठेवा. अथवा आल्या डायरी मध्ये लिहून ठेवा. तर महत्त्वाचं म्हणजे आपला ईमेल आणि पासवर्ड हा मुख्यत्वे करून लक्षात ठेवा. कारण यामध्ये आपले विविध अकाउंट चे पासवर्ड सुद्धा सेव्ह होत असतात. तर याच ईमेल चा पासवर्ड असेल तरच तुम्ही तुमच्या मोबाईल सापडण्याची शोध मोहीम सुरू करू शकता. तर मग चला स्वतः या डिजिटल वर्ड मध्ये सुज्ञान बनू आणि आपल्या येणाऱ्या समस्यांना तोंड देऊ. धन्यवाद!!
- Ramdas joshi

Comments
Post a Comment