Skip to main content

Calculator




विषयांची गणना (कॅल्क्युलेशन)-

नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की, मी आपल्यासाठी सतत कोणत्यातरी उपयुक्त कामासाठी नवनवीन टूल्स, नवीन ट्रिक्स, आणि खूप साऱ्या मजेशीर वेबसाईट या घेऊन येतो. ज्यांचा तुम्हाला तुमच्या दैनंदिन कामामध्ये उपयोग करता येईल. तसेच अश्या काही सुरक्षित राहण्यासाठी टिप्स ही याठिकाणी उपलब्ध करत असतो. जेणेकरून इंटरनेट वर तुम्ही सुरक्षित राहाल. कारण हॅकर्स हे रोज नवनवीन तंत्रज्ञान वापरून आपल्याला टार्गेट करत असतात. ज्याच्यामुळे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसतो. तर अश्या गोष्टींसाठी सुद्धा काही वेबसाईट उपलब्ध करून देतो आहे, ज्यामुळे तुम्ही त्या वेबसाईट व्दारे स्वतःची सुरक्षितता कायम ठेवू शकता. तर मग उपयुक्तता झाली, सुरक्षिततेच्या टिप्स झाल्या, मनोरंजनात्मक वेबसाईट झाल्या, परंतु शैक्षणिक तत्वावर मी सध्या कोणतीही वेबसाईट ही ऊपलब्ध करून दिली नाही. तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन वेबसाईट घेऊन आलो आहे. जी विद्यार्थांना उपयुक्त आणि महत्त्वाची ठरेल जिचा वापर करून तुम्ही गणितीय उदाहरणे सोडवू शकतात जसे की पुढील प्रमाणे. 
 
 विषयानुसार -   
                     १) जीवशास्त्र
                     २) रसायनशास्त्र  
                     ३) बांधकाम 
                     ४) संभाषण 
                     ५) इकोलॉजी
                     ६) रोजचे जीवन
                     ७) वित्त
                     ८) अन्न विषयक
अश्या विविध विषयांवर आपली कमांड योग्य रीतीने चालवू शकतात. ज्यामुळे या विषयांतील अवघड संकल्पना समजण्यास सोपे होइल. तुम्ही जर वाणिज्य विभागाचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला याचा फायदा अत्याधिक होणार आहे. तर मग चला कोणताही उशीर न करता आपण आपल्या वेबसाईट कडे वळण घेऊ. ती वापरण्यासाठी काही पायऱ्या आहेत ज्यांच अनुसरण करून तुम्ही तिथे पोहचू शकता.

पायऱ्या -
           १) खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा.
           २) पुढील पेजवर गेल्यानंतर विषय निवडा आणि ज्याच्याशी संबंधित तुम्हाला उदाहरणे सोडवायची आहेत तिथे क्लिक करा. आणि माहिती घ्या.
अश्याच मजेशीर वेबसाईट जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या. 

Comments