Skip to main content

Fix your mobile sound





आपल्या मोबाईलचा साऊंड दुरुस्त करा -

मित्रांनो जिवनात आपल्याला एक असा अनुभव नक्की भेटतो, की जो सर्वांसोबत घडतो, नकळत. कारण या गोष्टी जाणूनबुजून तर होत नाहीत. परंतु घडत असतात. आत्ता विचार करत असाल ना! कोणती गोष्टी असेल? की जी मी अत्यंत गंभीर वर्णनातून मांडली आहे. तर अस काही नाही. ती गोष्ट सामान्य आहे. ती म्हणजे आपला मोबाईल. जो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनून गेला आहे. ज्याला अधिक महत्त्व सध्याच्या युगात दिले जाते. तोच हा स्मार्टफोन कधी कधी आपल्या हातातून निसटतो आणि खाली पडतो. तस त्याच्यावरील धातूचे अथवा प्लास्टिक चे आवरण असल्यामुळे त्याला काही होत नाही. परंतु तोच मोबाईल जमिनीवर न पडता पाण्यात पडला तर मग मात्र त्याच्यावरील आवरण सुद्धा काही करू शकत नाही. की ज्यामुळे त्याचे संरक्षण होईल. कारण पाण्यात पडल्यावर त्याचे असणारे चार्जर, हेडफोन प्लग इन तसेच सर्किट यांच्या आतमध्ये पाणी गेल्यावर तिथे मोठ्या प्रमाणात बिघाड होताना आपल्याला दिसून येते. तसेच त्यामधील स्क्रीन खराब होते, मिनी माईक खराब होतो, मिनी साऊंड खराब होतात. अश्या विविध फंक्शन ला मोठ्या प्रमाणात खराबी होते. तर अश्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. तर मित्रानो आज मी जी काही वेबसाईट आपल्यासाठी घेऊन आलो आहे.
                                                 
 ती तुमचा मोबाईल जर पाण्यात पडला, आणि काही प्रमाणात जर मिनी माईक मध्ये पाणी गेलं.. तर त्या साऊंड चां आवाज हा खूपच खराब ऐकू येतो. तसेच कचरा सुद्धा त्याठिकाणी जाऊन बसतो, ज्यामुळे त्याचा सुमधुर आवाज खराब आवाजात रुपांतरीत होतो. तर यासाठी आज मी आपल्यासाठी एक अशी वेबसाईट घेऊन आलो आहे. की ज्याने आपल्या मोबाईल मधील कचरा हा बाहेर पडू शकतो. ज्यामुळे आपल्या मोबाईल मधील आवाजात सुधारणा होताना दिसून येईल. तर ही वेबसाईट खास त्यासाठीच बनवली गेलेली आहे.
                         
तीच्यामधून निघणाऱ्या ध्वनी लहरी या तीव्र प्रमाणात व्हायब्रेशन च्या स्वरूपात बाहेर पडतात. ज्यामुळे त्यामधील असणारा कचरा हा नक्की बाहेर पडतो. परंतु जर आपल्या मोबाईल मध्ये जर जास्त प्रमाणात पाणी गेले असेल. किंवा मोबाईल पाण्यात पूर्ण बुडून वरती काढला असेल. तर तुम्हाला या वेबसाईट चां वापर करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला मोबाईल शॉपी मध्येच भेट द्यावी लागेल. परंतु थोड्या प्रमाणात पाणी गेले असेल आणि मोबाईल ऑपरेट होत असेल, तर मग आपला मिनी साऊंड नीट करण्यासाठी ही वेबसाईट उपयुक्त ठरेल. चला तर मग आपण वेबसाईट कडे आपली पावले वळवू. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप्स
१) खाली दिलेल्या वेबसाईट वर क्लिक करा
२) पुढील पेजवर आल्यावर त्याठिकाणी असणाऱ्या  चित्रावर क्लिक करा आणि ध्वनी उत्पन्न करा 
अश्याच मजेशीर वेबसाईट जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या 

Comments