नमस्कार मित्रानो कसे आहात नक्कीच उत्तम असाल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या या टेक्नॉलॉजी वेबसाइट वर.....
मित्रानो ऑपरेटिंग सिस्टम बद्दल तुम्हाला माहितीच असेल तसेच याचा उपयोग आपण रोज कॉम्पुटर आणि मोबाईल मध्ये करत असतो. ज्याप्रकारे मोबाईल आणि इंटरनेट आपल्या जीवनाचा एक महत्वाचा घटक बनला आहे. ज्याच्या शिवाय आपण एक काम सुद्धा करू शकत नाही. अगदी असच मोबाईल आणि कॉम्पुटरला योग्य रीतीने काम करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम बनवला गेला आहे. जे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचा भाग आहे.
जसे की आपल्या शरीरामध्ये खूप सारे भाग असतात. जे आपल्याला सारे काम करण्यालायक बनवत असतात. भले एखाद्या भागाने काम करणे बंद केलं तरी आपण जिवंत राहतो, परंतु जर आपल्या शरीराचा मुख्य अवयव जसे की मेंदू काढला तर? शरीरात सर्व भाग असून तरी सुद्धा ते कोणत्याही कामाचे राहणार नाही. काही अशीच परिस्थिती आपल्या कॉम्पुटर आणि मोबाईल सोबत होऊ शकते. यांच्या आतमध्ये सुद्धा काही मशीनचे भाग लावलेले असतात. परंतु मोबाईल आणि कॉम्पुटर तयार केल्यानंतर जर ऑपरेटिंग सिस्टीम यांच्या आतमध्ये इंस्टॉल केलं गेलं नाही, तर तो मोबाईल अथवा कॉम्पुटर चालू होऊ शकत नाही.
त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम खूप महत्वाची आहे. कोणत्याही मोबाईल फोन, कॉम्पुटर, टॅबलेट अथवा पीसी साठी.
आज मी तुम्हाला या ऑपरेटिंग सिस्टिम शी जोडलेली सर्व माहिती देणार आहे. ज्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टम काय असत? ते कश्या प्रकारे काम करते? आणि त्यांचे किती प्रकार असतात? या सर्व गोष्टी संधर्भात या ब्लॉग मधून मी माहिती देणार आहे. त्यामुळे हा ब्लॉग नक्की पूर्ण वाचा.
तर सर्वात आधी जाणून घेऊ की ऑपरेटिंग सिस्टम काय आहे? ऑपरेटिंग सिस्टम ज्याला छोट्याशा स्वरूपात ओ एस सुद्धा बोललं जात. हे एक सिस्टिम सोफ्टवेअर आहे. जो कॉम्पुटरचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या मध्ये सगळ्या कामाचं संचालन करत असतो.
ऑपरेटिंग सिस्टम एक असा सॉफ्टवेअर आहे. जो युजर आणि कॉम्पुटर यांच्या मध्ये एक इंटर्फेस प्रदान करतो. ज्याच्या मुळे युजर कॉम्पुटरशी संवाद साधतो. आणी याच्यासाठी युजरला कॉम्पुटरची भाषा समजण्याची गरज सुद्धा लागत नाही. सगळ्या कॉम्पुटरला योग्य रीतीने काम करण्यासाठी आणि दुसऱ्या एप्लिकेशन्स आणि प्रोग्राम यांना चालू करण्यासाठी ओ एस ची आवश्यकता भासते. क्रोम, एम एस वर्ड, गेम्स, फोटोशॉप यांसारख्या एप्लिकेशन्सना एक माध्यम अथवा प्लॅटफॉर्म ची आवश्यकता असते. ज्यामध्ये ते चालवले जाऊ शकतात. आणि आपल्या टार्गेट ला पूर्ण करू शकतील. तसेच हा प्लॅटफॉर्म त्यांना ओ एस प्रदान करतो.
बिना ऑपरेटिंग सिस्टम शिवाय कॉम्पुटर हा कोणत्याच कामाचा नाही. कॉम्पुटर ऑपरेटिंग सिस्टम खूप साऱ्या छोट्या छोट्या प्रोग्रामचा समूह असतो. ज्याला एकसोबत जोडून सिस्टमच्या स्टोरेज डिव्हाईस मध्ये ठेवले जाते. हाच प्रोग्रामचा समूह असतो.
जो कॉम्पुटर चे रीसरचेस जसे की हार्डवेअर त्यांच्या कार्याना मॅनेज करतो. कॉम्पुटर चे हार्डवेअर आप-आपल्या शक्तीवर काम करू शकत नाही. आणि ना की एक दुसऱ्या सोबत इंट्रॅक्ट. त्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम द्वारे केले जाणारे इलेक्ट्रॉनिक सिग्नलच्या माध्यमातून हे हार्डवेअर आपल काम पूर्ण करतात.
ओ एस कॉम्पुटर मध्ये लोड होणारा पहिला प्रोग्राम असतो. आणि हे कॉम्पुटरच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांच्या मध्ये ब्रीज सारखा काम करतो. कारण हे दोघे सोप्या पद्धतीने एकदुसऱ्या सोबत चांगल्या पद्धतीने इंट्रॅक्ट करू शकतील. ऑपरेटिंग सिस्टमची काही वेगवेगळी नाव आहेत, परंतु त्यांचं काम एकसारखंच असत. आणि ते आहे युजर सोबत संवाद साधणे. आणि हार्डवेअरला मॅनेज करणे.
आत्तापर्यंतच्या अस्तित्वात असलेल्या सिस्टमची नाव आहेत विंडोज, ओ एस, मॅक ओएस, लिनॅक्स ओएस, अँड्रॉइड आय, ओ एस, एम.एस.डी, ओ एस सिंबियन ओ एस.
आणि आत्ता आपण जाणून घेऊ की ऑपरेटिंग सिस्टम काय काम करतो.
ऑपरेटिंग सिस्टम कॉम्पुटर चा सर्वात गरजेचा प्रोग्राम असतो जो कोणतही साधारण आणि महत्वपूर्ण कार्य करतो. जसे की कीबोर्डद्वारे इनपुट केली जाणारी बटणे समजणे, तसेच त्याचा आऊटपुट स्क्रीनवर दाखवणे, हार्ड डिस्क वर फाईल्स आणि डायरेक्टरीला मॅनेज करणे. आणि कॉम्प्युटरच्या सर्व भागांसोबत संवाद साधणे. यामध्ये या सर्व गोष्टी सामील असतात त्याचबरोबर हे अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला सक्षम आहे.
जसं की खालीलप्रमाणे...
1. मेमोरी मॅनेजमेंट
प्रायमरी मेमोरी अथवा मेन मेमोरी मॅनेजमेंटलाच मेमोरी मॅनेजमेंट म्हंटले जात. ऑपरेटिंग सिस्टम प्रायमरी मेमरीच्या प्रत्येक कार्याला ट्रॅक करतो. म्हणजे याचा कोणता भाग कोणत्या कामासाठी आहे आणि कोणता भाग कामासाठी नाही, मेमोरी कुठे युज होते, किती मेमोरी वापरली जात आहे. याचा पाठपुरावा करत असते. आणि मागितल्यावर मेमोरी उपलब्ध सुद्धा करून देतो. मल्टी प्रोसेसिंगच्या वेळी ओ एस ठरवतो की कोणत्या प्रक्रियेला केंव्हा आणि किती मेमोरी मिळावी.
2. प्रोसेसर मॅनेजमेंट
मल्टी प्रोग्रामिंगच्या वातावरणामध्ये ओ एस ठरवतो. की कोणत्या प्रकारे प्रोसेसर उपयोग करण्यासाठी केंव्हा आणि किती वेळासाठी द्यायचं आहे. याला fase scheduling म्हंटले जाते. ओ एस प्रोसेसर आणि प्रोसेसरच्या स्थिती वर नजर ठेवतो. या कार्यासाठी ओ एसच्या ज्या प्रोग्रामचा उपयोग होतो, त्याला ट्रॅफिक कंट्रोल या नावाने ओळखले जाते.
3. डिव्हाईस मॅनेजमेंट
ऑपरेटिंग सिस्टम आपल्या संबंधित माध्यमाद्वारे डिव्हाईस कमुनिकेशनचा उपयोग करतो. यासाठी सगळ्या डिव्हाईस वर ओ एस नजर ठेवतो. या कार्यासाठी ज्या प्रोग्रामचा उपयोग होतो त्याला इनपुट आऊटपुट कंट्रोलर या रूपाने ओळखले जातात.
तर ही होती ऑपरेटिंग सिस्टम बद्दलची माहिती. अश्याच महत्वाच्या पोस्ट मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या धन्यवाद!
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment