मित्रांनो आपण आपल्या जीवनात इंटरनेटशी सध्या इतके जोडलेले आहोत की त्याची ओळख ही सर्वांना आहे. आणि याच ओळखीच्या आधारावर आपण इंटरनेटशी जोडले गेलेलो आहोत. खर तर इंटरनेटच महाजाल हे अत्यंत मोठ्या प्रमाणात पसरलेले आहे. त्याचप्रमाणे त्याच्या माध्यमातून कोणतीही कामे करणे सोप्पे झाले आहे. आपल्याला काही प्रश्न अडले असतील अथवा माहिती हवी असेल तर आपण क्रोम ब्राउझर ओपन करतो. आणि हवी ती गोष्ट सर्च करून मिळवतो, परंतु तुम्हाला माहीत आहे का आपण जे ब्राउझर वापरतो क्रोम ब्राउझर. तर त्यापेक्षा ही काही असे ब्राउझर आहेत जे आपल्याला माहीत नाहीत.
तर चला आज मी या माहित नसणाऱ्या ब्राउझर आणि वेब बद्दल याठिकाणी माहिती देणार आहे.
तर इंटरनेट हे किती मोठं आहे हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु त्यांच्या सुद्धा लेयर आहेत त्यामध्ये
1) सर्फेस वेब
2) डीप वेब
3) डार्क वेब
अशा तीन भागांमध्ये हे वेब तयार केलेले आहेत तर यांची सखोल माहिती घेऊयात.
1) सर्फेस वेब
आपण आपल्या दैनंदिन जीवनात ज्या काही गोष्टी गुगल वर सर्च करत असतो. तर या सर्व गोष्टी सर्फेस वेब मध्ये समाविष्ट असतात. जसे की आपल्याला हवी असणारी वेबसाईट तिचे नाव टाकल्यावर लगेच ती आपल्या कॉम्पुटर/मोबाईलच्या स्क्रीनवर उघडते. कारण या सर्व वेबसाईट गुगल सर्च इंजिनमध्ये अनुक्रमित असतात. ज्यामुळे आपण कोणत्याही वेबसाईटचे यू आर एल टाकल्यावर त्यांचे रिझल्ट आपल्याला दिसू लागतात. तर या सर्व गोष्टी ज्याठिकाणी असतात त्याला सर्फेस एरिया म्हणतात. ज्या आपल्याला त्वरित कार्यावर प्रतिसाद देतात.
2) डीप वेब/डार्क वेब
मी तुम्हाला सांगितले, की तुम्हाला एखादी ऑर्डर एखाद्या पत्त्यावर पोहोचवायची आहे. तर तुम्हीं ती कशी पोहोचवणार? तर तुम्ही आधी मार्ग काढणार, आणि मग त्या दिशेने जायला सुरुवात करणार, आणि तुम्हाला दिलेल्या पत्त्यावर तुम्ही पोहोचणार. अश्याच प्रकारे डीप वेब आणि डार्क वेबच आहे. मित्रानो हा जो काही भाग आहे तर हा सर्वप्रथम यू एस मध्ये असणारी मिलिटरी एजन्सी आहेत त्याठिकाणी गुप्तहेर संघटनेचे जे काही मॅसेज आहेत तर ते या वेबसाइट द्वारे पाठवले जायचे कुणाला कळू नयेत म्हणून. या वेसाइट साधारण वेब ब्राउझर वर सर्च केल्यावर दिसत नाहीत. तर त्यासाठी एक विशिष्ट वेब ब्राउझर वापरावं लागत त्याच नाव tor browser अस आहे. या ब्राउझरच प्रमुख काम आहे की युजर चे आयपी ऍड्रेस सेक्युर ठेवणे. त्यासाठी हे ब्राउझर सक्षम आहे त्याला Onion browser असे ही संबोधले जाते. कारण आपण ज्यावेळी वेबसाईट सर्च करतो तेंव्हा ती वेबसाइट काही लेयर मधून आपल्यापुढे सादर होते. जेणेकरून आपले आयपी ॲड्रेस हे वेगवेगळ्या नेटवर्क वरून जात असतात. आणि दुसरेच आयपी ऍड्रेस त्याठिकाणी दिसतात. त्यामुळे आपल्या आयपी ॲड्रेसचा सहसा शोध लागत नाही.
तसेच मित्रानो या वेबसाईट वर काही सर्च करणे म्हणजे अत्यंत धोकादायक असू शकते. कारण या वेबसाईट वर अनेक गोष्टी या बेकायदेशीर रित्या केल्या जातात. जसे की नशीले पदार्थ विक्री, हत्यारांची विक्री, मनुष्य अवयवांची विक्री, डेबिट क्रेडिट कार्डची माहिती. तसेच लाईव्ह असे काही चित्रीकरण जे आपल्याला भयाच्या दरीत ढकलू शकतात. आणि अश्या अनेक गोष्टी त्याठिकाणी आहेत, की ज्या आपल्या मानसिकतेवर अत्यंत वाईट प्रकारे परिणाम घडवून आणू शकतात. आणि त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सायबर अटॅक हे होत असतात. जसे की आपला डेटा चोरला जाऊ शकतो हॅकर्स मार्फत. तर मग तुम्ही विचार करत असाल की या वेबसाईट कश्या पद्धतीने वापरतात? तर मित्रानो या गोष्टीत जाण्याचा सल्ला तर मी तुम्हाला देऊ शकत नाही केवळ माहिती मिळावी या आधारावर तुम्हाला याची माहिती देत आहे तर याचा उपयोग तुमच्या माहितीसाठी कराल.
अश्याच काही महत्वाच्या टिप्स आणि माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या संकेतस्थळावर भेट द्या
-Ramdas Joshi

Comments
Post a Comment