तर ज्याठिकाणी आपण जाणार आहोत त्याठिकाणहून कुणीही आपल्याला घ्यायला येत असते. जेणेकरून योग्य गल्लीत आणि योग्य त्याच घरात आपली एन्ट्री होवो. आणि आजकाल आपण मोबाईल काढतो, आणि गुगल वर सर्च करतो. आणि मग त्या दिशा दर्शविणाऱ्या बाणावर क्लिक करतो आणि मग झालं आपल काम.
गूगल मॅप आपल्याला आपला रस्ता सापडून देतो. तस सोप्प्या भाषेत सांगायचं झालं. तर एखाद्या अनोळख्या पत्त्यावर पोहोचायच असल, तरी आपल्याला त्याठिकाणी हे गूगल मॅप पोहोचवत. म्हणजेच हे आंधळ्या माणसाच्या काठीप्रमाणे आहे जे आपल्याला हवं त्या ठिकाणी पोहोचवत.
आपण रानिंग अथवा सायकल चालवण्यासाठी जातो. तर त्यामध्ये जे अंतर कापतो, तर त्याची माहिती सुद्धा GPS मधून समजते. आत्ता गुगल मॅप ज्या टेक्नॉलॉजी वर चालतो. त्याला म्हणतो GPS म्हणजेच global positioning system. अश्याच टेक्नॉलॉजी ने आपल जीवन इतकं सोप्प बनवल आहे, की छोटासा पत्ता, दुकान,हॉटेल,ढाबा, गॅरेज जवळजवळ सगळच हे या गुगल मॅप वर उपलब्ध आहे.
आपल लाईव्ह लोकेशन शेअर करण्यासाठी लाईव्ह लोकेशन, हे अपडेट जेंव्हा पासून व्हॉट्सॲप वर आल आहे. तेंव्हापासून रजिस्टर नसणारे ॲड्रेस वर सुद्धा आपण लोकांना बोलवून घेतो आणि जातो सुद्धा.
तर मग मी आज तुम्हाला या GPS च्या युगात घेऊन जाणार आहे. ज्याठिकाणी तुम्हाला या GPS बद्दल सखोल माहिती होणार आहे.
GPS ज्याचा fullform आहे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. खर तर हे एक सैनिकी खात्याचा आविष्कार आहे. याचं नाव होत nave star आणि याचा उपग्रह 1978 मध्ये लॉन्च केला. अमेरिकेत GPS सगळ्या प्रकारे 1995 मध्ये काम करू लागले. परंतु वर्ष 2000 पर्यंत क्वालिटी सिग्नल केवळ सैनिकी कामकाजासाठी होत. त्यानंतर सामान्य माणसांसाठी याला एका फ्री सर्व्हिस प्रमाणे सुरू केलं गेलं. आज अमेरिकेत जी GPS टेक्नॉलॉजी आहे त्याला अमेरिका एअरफोर्स मॅनेज करते.
आजकाल जी रिसीवर आहेत ते GPS सोबत रशियातील ग्लोनास उपग्रहाला जोडलेले असतात. जेणेकरून दुनियेतील कोणत्याही कोपऱ्यात योग्य ती माहिती पोहोचू शकेल.
चला आत्ता ही टेक्नॉलॉजी कशी काम करते ते जाणून घेऊयात......
GPS चे काम करण्याचे तीन मुख्य भाग आहेत.
1) satellites
2) ground station's
3) recivers
जर उपग्रहाबाबत सांगायचं झालं, तर जसे आपले पूर्वज आकाशात चमकणाऱ्या ताऱ्याना पाहून आपली दिशा आणि जागेचा अंदाज लावत होते. तेच काम आजचे मॉडर्न उपग्रह करतात. यांना काम करण्यासाठी योग्य वेळ आणि योग्य जागी असणे खूप गरजेचे आहे. ग्राउंड स्टेशन रडार मार्फत याचा शोध घेतात की उपग्रह नक्की कुठे आहेत. हे तेच आहेत ज्यांना वास्तविक ठिकाणी असायला हव. आत्ता तुमची कार मोबाईल अथवा अन्य कोणत्याही उपकरणामध्ये मॅप आहे तर त्याचा जो काही रीसीवर आहे तो याचा शोध घेतो, की उपग्रह किती अंतरावर आहे.
जेंव्हा रिसीवरला हे कळते की अश्या चार उपग्रहापासून ते किती दूरवर आहे. तर हेच आपल लोकेशन असत. आणि हे इतकं ॲक्यूरेट असत की आपण किती किलोमिटर अथवा दूर आहोत याची माहिती सुद्धा आपल्या प्राप्त करणाऱ्या उपकरणापर्यंत अथवा मोबाईल डिव्हाईस वर दिसू लागते. अमेरिकेच्या GPS सिस्टीम मध्ये ३२ उपग्रह आहेत. जे आपल्या पृथ्वीभोवती भ्रमण करत आहेत. यामध्ये २४ कोर उपग्रह आहेत आणि बाकी आठ रीप्लेसमेंटसाठी आहेत. जर या चोवीसपैकी कोणत्याही उपग्रहात कोणतीही अडचण निर्माण झाली. तर ते आठ उपग्रह जे बदलीसाठी ठेवले आहेत. तर ते आपत्कालीन परिस्थितीसाठी ठेवले आहेत. चोवीस तास न थांबता काम करण्यासाठी यांची देखरेख आणि मेंटनंस् आणि दुरुस्तीच काम सुद्धा पहायचं असत. एवढं सगळ करूंन ही हे केवळ दहा वर्षच आपली सर्व्हिस देतात. यांना काही अश्या प्रकारे बनवलेलं असत की हे कोणत्याही ऋतमध्ये काम करू शकतील. परंतु या सर्वांमध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुमचा मोबाईल अथवा सिग्नल प्राप्त करणारे डिव्हाईस. एक साथ चार उपग्रहासोबत जोडून राहणे तेंव्हाच आपल्याला आपली योग्य दिशा मिळते.
तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा. आणि अश्याच वैविध्यपूर्ण ज्ञानावर आधारित माहिती मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळावर भेट द्या धन्यवाद!
- Ramdas Joshi

Comments
Post a Comment