Skip to main content

Online digital marketing grow your business


जगामध्ये लाखो करोडो लोक घरबसल्या आपल्या आवडत्या वस्तू तसेच गरजेच्या वस्तू खरेदी करत असतात. तसेच ती खरेदी कोणत्याही गोष्टीसाठी असो स्वतःच्या गरजा,लग्न सराई अथवा सण समारंभ. काही वर्षांपासून लोकांची खरेदी करण्याची पद्धत जरा बदलली आहे. पहिल्यासारखे लोक मार्केट मध्ये जाऊन सामान खरेदी करत नाहीत, तर ऑनलाईन पद्धतीने सर्व सामान बघतात. आणि पसंत पडलेले सामान ऑनलाईन ऑर्डर करतात. 

त्यामुळे जी लोक बिझनेस करतात जसे की कपड्यांचे दुकान, खेळण्यांचे दुकान अथवा किराणाचे दुकान चालवतात, तर त्यांचे बिझनेस हे या ऑनलाइन सेवेमुळे बंद पडू लागली आहेत. तर याच समस्येचं निराकरण करण्यासाठी आम्ही यावर उपाय घेऊन आलो आहोत. तर यासाठी आमच्या ब्लॉग सोबत शेवटपर्यंत जोडून रहा. 

तर आपला व्यवसाय हा योग्य रीतीने वाढावा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला फायदा मिळावा. यासाठी यावर उपाय आहे. डिजिटल मार्केटिंग 

हे डिजिटल मार्केटिंग काय आहे? आणि याची गरज का आहे? तसेच याचा उपयोग कुठे आणि कसा करायचा आहे या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉग मध्ये मिळणार आहेत. 

सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की डिजिटल मार्केटिंग काय आहे. डिजिटल मार्केटिंग कॉम्पुटर, टीवी, आणि मोबाईल तर या साधनांच्या आधारावर केली जाणारी मार्केटिंग आहे. तर या मार्केटिंग द्वारे कोणतीही कंपनी ही आपल्या वस्तूंची विक्री करू शकतात. ज्याला आपण ऑनलाईन मार्केटिंग असे म्हणतो. जेंव्हा एखादी कंपनी आपला व्यवसाय अथवा कोणत्याही प्रॉडक्टला बाजारात विकायला काढते. तेंव्हा सर्व लोकांपर्यंत पोहोचवा या उद्देशाने मार्केटिंग करते. 

मार्केटिंगचा अर्थ आहे योग्य ठिकाणी आणि योग्य त्या कस्टमरशी जोडून राहायचं. आत्ताच्या घडीला तुम्हाला त्याठिकाणी वेळ द्यावा लागेल, ज्या ठिकाणी तुमचे ग्राहक त्यांचा वेळ घालवतात. आणि ती जागा आहे इंटरनेट. भारतात जवळजवळ सगळीच लोक इंटरनेट चा उपयोग करतात. आणि दिवसेंदिवस याची संख्या वाढतच आहे. 

मग ती मोठी कंपनी असेल अथवा छोटी प्रत्येकजण आत्ता मार्केटिंग करण्यासाठी इंटरनेटचा उपयोग करत आहे. ज्याप्रकारे एखादी कंपनी आपल्या वस्तूंची जाहिरात मोठ मोठे पोस्टर आणि बॅनर यांच्या माध्यमातून प्रचलित करत असतात. ठीक अश्याच प्रकारे ऑनलाईन इंटरनेट मार्केटिंग अथवा डिजिटल मार्केटिंग केली जाऊ शकते. 

ऑफलाईन मार्केटिंग असो अथवा ऑनलाईन मार्केटिंग दोन्ही गोष्टींचा मुख्य उद्देश्य आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे. ऑफलाईन मार्केटिंग मध्ये वस्तूंची जाहिरात करण्यासाठी खूप मोठा खर्च येतो. आणि डिजिटल मार्केटिंग मार्फत आपण खूप कमी खर्चात दुनिया भर असलेल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. 

आणि आपण आत्ता जाणून घेऊ की डिजिटल मार्केटिंग का गरजेची आहे. 

डिजिटल मार्केटिंग डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक शक्तिशाली माध्यम आहे. जेंव्हा स्मार्टफोन नव्हते तेंव्हा लोक टीवी, न्यूज पेपर आणि रेडिओचा उपयोग जास्त करत असायचे. तेंव्हा या सर्व जागी असंख्य अश्या कंपन्या आपल्या वस्तूंची जाहिरात देऊन प्रचार करत असत. आणि लोक त्याच जाहिराती पाहून बाजारातून वस्तू खरेदी करुन आणत असत. 

परंतु या स्मार्टफोन च्या काळात अधिकतर लोक खास करून तरुणवर्ग आपला पूर्ण वेळ फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर वर घालवतात. टीवीच्या जागेवर यू ट्यूबच्या व्हिडियो बघतात, रेडिओच्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारच्या ॲप्स वर गाणे ऐकतात. आणि न्यूज पेपरच्या जागी ऑनलाईन ब्लॉग वाचत बसतात. हेच कारण आहे की आत्ता कंपन्या आपल्या वस्तूंची जाहिरात ही डिजिटल स्वरूपात करत आहे. 

आणि त्याच जागी प्रचार करतात ज्याठिकाणी मोठया प्रमाणात इंटरनेट वापरकर्ते असतात. डिजिटल मार्केटिंग मार्फत कंपनीला अधिक ग्राहकांसोबत पोहोचवण्यास मदत मिळते. पहिल्यांदा लोकांना बाजारात जाऊन साहित्य पसंत करून तर खरेदी करण्यात जो वेळ जायचा, तर आत्ता त्यापेक्षा कमी वेळात लोक घरबसल्या इंटरनेट मार्फत मनपसंत साहित्याची शॉपिंग घरीच करतात. 

डिजिटल मार्केटिंग मुळे केवळ ग्राहकांनाच नव्हे तर व्यापारी वर्गाला ही व्यापार करण्यातून खूप फायदा होऊ लागला आहे. कारण यापासून खूप कमी वेळात मोठ्या संख्येने लोकांपर्यंत जोडू लागले आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीत अधिक वेग आला आहे. 

डिजिटल मार्केटिंगची मागणी वर्तमान काळात जास्त दिसू लागली आहे. कारण डिजिटल मार्केटिंग मध्ये कमी खर्चात जास्त फायदा मिळतो.

अश्याच महत्वाच्या पोस्ट मिळवण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.

                                                                                                           - Ramdas joshi

Comments