त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या आवडीला फॉलो करत असताना, एक स्केच आर्टिस्ट बनू शकता. तसेच तुम्ही तुमच्या कौशल्य गुणांमुळे एक शानदार करियर बनवू शकता. परंतु यासाठी तुम्हाला काय करावे लागेल? आणि कसं करावं लागेल? हे सगळं तुम्हाला जाणून घ्यावे लागेल. यामुळेच मी हा लेख तयार केला आहे. ज्यामध्ये मी तुम्हाला स्केच आर्टिस्ट बनण्याच्या संदर्भात सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. त्यामुळे यामध्ये असलेली महत्त्वाची माहिती शेवटपर्यंत वाचा. कारण तुम्हाला समजू शकत की स्केच आर्टिस्ट बनन हे तुमच्यासाठी महत्त्वाच आहे. की नाही तर मग चला समजून घेऊ.
सर्वप्रथम स्केच आर्टिस्ट कोण असतो? हे समजून घेऊ. खरं म्हणजे स्केच आर्टिस्ट तो आहे, जो स्केचिंग टेक्निक्सचा वापर करून विविध चित्र तयार करतो. ज्यावेळी कॅमेरा नव्हता तेव्हा स्केच आर्टिस्टच आपल्या टेक्निक्स चा वापर करून हुबेहूब चित्रे काढत असतो. सध्या तर आर्ट लवरची कमी नाहीये. त्यामुळे आर्ट गॅलरी आणि म्युझियमच्या भिंतीवर चित्रेच चित्रे काढलेली असतात. स्केचिंग ही अशी कला आहे ज्यामध्ये स्केच आर्टिस्टला एक्सपर्ट होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याला पेन्सिल, चारकोल आणि पेस्टलचा उपयोग करून लोकांच्या विचारांना त्या चित्राच्या स्वरूपाने पुढे आणू शकेल. त्याचप्रमाणे तुम्हाला सुद्धा असेच चित्रे आवडतात ना! जी हुबेहूब लोकांच्या विचारांतून अथवा वेगवेगळ्या ठिकाणांवरील निसर्ग सौंदर्य प्रकट करतील. तर हेच एका स्केच आर्टिस्टच कौशल्य असत.
की ज्याने हावभाव आणि भावना यांना त्या चित्रामध्ये अत्यंत तंतोतंत व्यक्त केलेलं असेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी खूप साऱ्या आवडी त्याचप्रमाणे तुमची रुची आणि प्रयत्नांची जोड लागते. आणि हा कृतिशील मन आणि कल्पना या प्रोफेशनची पहिली मागणी समजा. एक सक्सेसफुल स्केच आर्टिस्ट बनण्यासाठी तुम्हाला गरज आहे प्रस्पॅक्टीव, श्याडो, आणि लाईट काँट्रान्स या याप्रकारे लागू करता आले पाहिजे' की ती पेंटिंग खरी वाटली पाहिजे. स्केच आर्टिस्ट हा एक असा प्रोफेशनल असतो. जो वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी स्केचेस आणि ड्रॉइंग बनवतो.
एक स्केच आर्टिस्ट आर्किटेक्चर फर्म मध्ये सुद्धा कामाला लागू शकतो. ज्या ठिकाणी तो घरे आणि बिल्डिंग यांची चित्रे बनवू शकेल. आणि तो पोलीस खात्यात सुद्धा कामाला लागू शकतो. ज्या ठिकाणी पुरावे आणि विविध खूनांचे स्केचेस बनवेल. काही स्केच आर्टिस्ट हे शिकवणे पसंत करतात. तर काही वैज्ञानिकांसोबत काम करणे पसंत करतात. जे स्केच आर्टिस्ट पोलीस खात्यासाठी काम करतात त्यांना फॉरेन्सिक आर्टिस्ट म्हटलं जातं. आणि त्यांना काहीही न पाहता पुरावे दाराच्या सांगण्यावरून स्केच बनवावे लागतात. ते पण एकदम खरे वाटायला हवे अस बनवावे लागतात. तसेच हे सर्व आर्टिस्टच्या मनावर असत की तो कोणत्या क्षेत्रात काम करू इच्छितो. म्हणजेच तो मनोरंजन क्षेत्रात काम करू इच्छितोय. अथवा फॉरेन्सिक आर्टिस्ट सारखं काम करू इच्छितोय.
स्केच आर्टिस्ट होण्यासाठी खूप सार्या कौशल्य गुणांची गरज असते. जी कौशल्य तुम्हाला एक सक्सेसफुल आर्टिस्ट बनवण्यासाठी मदत करतील. म्हणजेच रिअल आणि परफेक्ट स्केच बनवण्यासाठी आर्टिस्ट मध्ये प्रस्पेक्टिव्ह, प्रपोर्शन, कंपोझिशन, ॲनाटोमी, लाइटिंग यांची गरज असणे हे महत्वाचं आहे. तस तर स्केच आर्टिस्ट जाणून घेतल्यानंतर त्यासाठी कोणत शिक्षण घ्यावं लागत. तर सध्यातरी स्केच आर्टिस्ट बनण्यासाठी कोणत्याही फॉर्मल शिक्षणाची गरज नसते. परंतु असे आर्टिस्ट जे आपल्या करियरला घेऊन खूप सिरियस आहेत. आणि खूप सक्सेसफुल स्केच आर्टिस्टच्या आधारावर नाव आणि पैसे कमवू इच्छितात.
ते आपल्या करियरला सुरक्षित करण्यासाठी फॉर्मल डिग्री घेऊ शकतात. जे त्यांच्या कौशल्याला सपोर्ट करेल, डेव्हलप करेल. कारण काही ठिकाणी डिग्री वर नोकऱ्या ऑफर केल्या जातात. जर तुम्ही फ्रीलांस म्हणून काम करू इच्छित असाल, तर ते सुद्धा तुम्हाला करता येऊ शकत. ज्यामध्ये काही क्लाएंट साठी तुमचं कौशल्य आणि काम हेच खूप होईल. कारण हेच क्लाएंट आणि कंपन्या तुम्हाला जॉब ऑफर करण्या अगोदर तुमची डिग्री आणि काम बघून तुम्हाला जॉब देऊ शकतात. त्यामुळे तुमच्यासाठी महत्वाचं हेच असेल, की ज्याला तुम्ही करियर बनवू इच्छित आहात. त्याच्या सर्व गोष्टी जाणून घ्यायला हव्यात. यासाठी तुम्ही ड्रॉइंग आणि पेंटिंग मध्ये सुध्दा बॅचलर डिग्री घेऊ शकता. आणि पदवी सुद्धा प्राप्त करू शकता. असे खूप सारे डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत ज्यामार्फत तुम्ही तुमचं स्केचिंग कौशल्य वाढवू शकता.
तर अपेक्षा करतो की आपल्याला ही माहिती तुमचं करियर बनवण्यासाठी एक ज्ञानाचा स्रोत बनेल तसेच तुम्हाला आमची माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा
अश्याच वैविध्यपूर्ण ज्ञानावर आधारित माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या धन्यवाद!
- Ramdas joshi

Comments
Post a Comment